शेतक:यांना पीककर्जासोबत रोपांचे वाटप

By Admin | Updated: May 29, 2017 17:20 IST2017-05-29T17:20:07+5:302017-05-29T17:20:07+5:30

अंतुुर्ली खुर्द विकासोने दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश. 355 रोपांचे कजर्दार आणि सभासदांना वाटप

Farmers: Distribution of seedlings with peak crops | शेतक:यांना पीककर्जासोबत रोपांचे वाटप

शेतक:यांना पीककर्जासोबत रोपांचे वाटप

 ऑनलाईन लोकमत

खडकदेवळा, जि.जळगाव,दि.29- पाचोरा तालुक्यातील  अंतुर्ली खुर्द येथील वि.का.सो कडुन कर्ज वाटपासोबतच  सुमारे  355 सभासदांना  रोपांचेही वाटप करण्यात आले. आमदार व  जिल्हा बँकेचे व्हा. चेअरमन  किशोर  पाटील यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. 
संस्थेच्या वतीने  प्रत्येक सभासदांना वृक्ष वाटप केले. या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे परिसरात कौतुकच होत आहे. अशा प्रकारे या कार्यक्रमाद्वारे वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाचा संदेशच या माध्यमातुन दिला गेला आहे.
कार्यक्रमास बँकेचे अधिकारी धनंजय शिदे, सरपंच दादा पिरचंद पाटील, जेडीसीसी बँकेचे क्षेत्रीय अधिकारी नानासाहेब पाटील, पाचोरा बँक शाखा व्यवस्थापक दिलीप झोपे, प्रमोद पाटील , सुभाष पाटील,   संस्थेचे चेअरमन आलिशानबी पिजारी, व्हाईस चेअरमन प्रशांत शिवाजी पाटील, गणेश पाटील, निंबा पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Farmers: Distribution of seedlings with peak crops