शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
3
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
6
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
7
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
8
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
9
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
10
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
11
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

मंकी ब्रिज, रोप क्लायबिंगसह रोप क्रॉसिंगचा अनुभवला थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 6:22 PM

स्काउट-गाईड शिबिर : मध्यप्रदेशात विद्यार्थ्यांनी घेतले प्रशिक्षण

जळगाव- टनेल क्रॉसिंग...पॅरेलल रोप... मंकी ब्रिज आणि रॉप क्रॉसिंगसह विविध साहसी खेळांचा विवेकानंद प्रतिष्ठान संचलित बग़ो़ शानभाग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी थरारक अनुभवला़ निमित्त होते मध्य प्रदेशातील पंचमढी येथे आयोजित पाच दिवसीय स्काउट-गाईड शिबराचे.पाच दिवशीय शिबिरासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिकाअंजली महाजन व उपमुख्याध्यापक जयंतराव टेंभरे यांचे मार्गदर्शन होते. यावेळी शिबिरात इयत्ता नववीतील ७४ स्काऊट, ३३ गाईड आणि ११ शिक्षक यांचा समावेश होता़ दरम्यान, शिबिरासाठी राष्ट्रीय स्काऊट आणि गाईड साहसी केंद्राचे एस.एस.रॉय आणि बिलकिस शेख यांचे महत्वपूर्ण मार्गदर्शन लाभले.धनुर्विद्यासह रायफल शुटींगचेही घेतले धडेशिबिरासाठी १५ टेंटची उभारणी करण्यात आली होती़ प्रथम दिवशी टेंट सजावट व फूड विदाउट फायर ही स्पर्धा घेण्यात आली़ नंतर दुसऱ्या दिवशी अडथळयांचे खेळ जसे टायर स्विंग, टनेल क्रॉसिंग, पॅरेलल रोप, मंकी क्रौलिंग, टायर वाक, बॅलेन्सिंग अपॉन पेज, रोप क्लायमबिंग, बीम क्लायमबिंग, बॅलेन्सिंग झुला, स्विंग जंप, मंकी ब्रिज, टायरक्लायमबिंग, चिमणी क्लायमबिंग, रोप क्रॉसिंग आणि मंकी रोलिंग असे खेळ तसेच साहसी खेळांमध्ये धनुर्विद्या, रायफल शुटींग, घोडेस्वारी, रॉक क्लायमबिंग आणि रॅपलिंग असे साहसी खेळांचा अनुभव घेतला.ऐतिहासिक स्थळांना भेटीऐतिहासिक व धार्मिक परिस्थितीचा अभ्यास व्हावा यासाठी अनेक स्थळांना भेटी देऊन त्या स्थळांची विद्यार्थ्यांनी माहिती जाणून घेतली. यात प्रामुख्याने डॉ. राजेन्द्रप्रसाद उद्यान, मिड पॉईंट, गुप्त महादेव मंदिर, बडा महादेव मंदिर, जटाशंकर मंदिर, हांडी खो, पांडवलेणी उद्यान व अंबाबाई मंदिर या स्थळांचा समावेश होता. पाण्याच्या प्रवाहामुळे निर्माण झालेले वेगवेगळे पर्वतांचे आकार, बदललेले खडकांचे आकार, रंग, दगडांवरील शैवाल ही भौगोलिक माहितीही विद्यार्थ्यांना येथे मिळाली. तसेच पाण्यावर तरंगणारा अद्भूत दगडही विद्यार्थ्यांनी येथे बघितला.

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव