बीएसएनएलतर्फे तक्रार निवारण कक्षाची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:58 IST2021-02-05T05:58:50+5:302021-02-05T05:58:50+5:30

यावेळी बीएसएनएलचे जळगाव विभागाचे महाव्यवस्थापक संजय केशरवाणी, सहायक महाव्यवस्थापक जे.पी. दामले यांच्यासह आर.एस. नेहते, डी. जी. डहाके, एम.बी. बोरसे, ...

Establishment of Grievance Redressal Cell by BSNL | बीएसएनएलतर्फे तक्रार निवारण कक्षाची स्थापना

बीएसएनएलतर्फे तक्रार निवारण कक्षाची स्थापना

यावेळी बीएसएनएलचे जळगाव विभागाचे महाव्यवस्थापक संजय केशरवाणी, सहायक महाव्यवस्थापक जे.पी. दामले यांच्यासह आर.एस. नेहते, डी. जी. डहाके, एम.बी. बोरसे, डी.एम. बोंडाळे, जितेंद्रकुमार, अरुणा राठी, सीमा पिंपारकर, रिझवान शेख, राहुल जगताप आदी विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. बीएसएनएलतर्फे जळगाव विभागात प्रथमच अशा प्रकारचे तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले असून, या कक्षात २४ तास कर्मचारी नियुक्त राहणार आहेत. या कक्षाच्या माध्यमातून बीएसएनएलचे लॅण्डलाईन, ब्रॉडबँड, ऑप्टिकल फायबर कनेक्शन, लिज्ड सर्किट, संचरण, सीपॅन उपकरणे व मोबाइल नेटवर्कच्या समस्यांबाबत तक्रारींचे निराकरण केले जाणार आहे.

इन्फो :

तक्रारींसाठी लवकरच दूरध्वनी क्रमांक जाहीर होणार

बीएसएनएलतर्फे देशभरात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अशाप्रकारे तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले असून, यासाठी लवकरच निशुल्क दूरध्वनी क्रमांक जाहीर करण्यात येणार आहे. ग्राहकांनी दूरध्वनी क्रमांकावर तक्रार केल्यावर संबंधित कर्मचारी ज्या भागातील ही तक्रार असेल, त्या भागातील व्यक्तीला तत्काळ ती तक्रार सोडविण्याच्या सूचना करेल. या तक्रारींचे निवारण संबंधित कर्मचाऱ्याला चार तासांच्या करण्याचे बंधनकारक करण्यात येणार आहे. या तक्रार निवारण कक्षामुळे बीएसएनएलची सुविधा गतिमान होणार असल्याचा विश्वास संजय केशरवाणी यांनी यावेळी व्यक्त केला.

Web Title: Establishment of Grievance Redressal Cell by BSNL