शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
2
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
3
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
4
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
5
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
6
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
7
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
8
Hanta Virus : ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास... हंता व्हायरसने घेतला ३ जणांचा बळी, 'ही' आहेत लक्षणं
9
तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?
10
पाकिस्तानी खेळाडूंना भारतात नो एन्ट्री, केवळ बहुपक्षीय स्पर्धांसाठीच परवानगी; भारत सरकारकडून भूमिका स्पष्ट
11
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
12
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
13
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
14
यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
15
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
16
‘‘जॉनी जॉनी येस पापा’, सारख्या कविता मुलांना खोटं बोलायला शिकवतात’, उत्तर  प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांचा दावा  
17
Viral Video: सांगितली स्कूटर अन् दरात उभी केली बीएमडब्लू, लेकानं दिलेलं गिफ्ट पाहून आई- बाबा झाले शॉक!
18
Trisha Krishnan : महागड्या कार, आलिशान घरासह कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री तृषा कृष्णन
19
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
20
सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
Daily Top 2Weekly Top 5

एरंडोलच्या कपाशी व्यापार्‍याच्या खुनाचे गूढ उकलले

By admin | Updated: February 12, 2015 13:36 IST

कपाशीचे व्यापारी बाळू दामू पाटील यांच्या खुनाचे गूढ उकलण्यात एरंडोल पोलिसांना यश मिळाले असून पप्पू उर्फ नगराज महाजन व पंकज सुरेश धनगर यांनी बाळूला काठीने मारहाण करून ठार केले होते.

एरंडोल : कपाशीचे व्यापारी बाळू दामू पाटील यांच्या खुनाचे गूढ उकलण्यात एरंडोल पोलिसांना यश मिळाले असून पप्पू उर्फ नगराज महाजन व पंकज सुरेश धनगर यांनी बाळूला काठीने मारहाण करून ठार केले व पोत्यात घालून पोते शिवून पाटाच्या वाहत्या पाण्यात टाकले. आधी बाळूचे प्रेत पाण्यात फेकलेव नंतर मोटारसायकल टाकली, असे तपासाअंती उघडकीस आले आहे.
एरंडोल पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक एकनाथ पाडळे यांनी दिलेली माहिती अशी की, आरोपींनी दुचाकीचे शेतात पेट्रोल संपले असे सांगून पप्पू महाजन याने बाळूच्या मोटारसायकलवर बसून पप्पूच्या शेतात नेले. त्याठिकाणी पप्पू व पंकज यांनी बाळूला मारायला सुरुवात केली व बांधाला लागून असलेल्या पठाणच्या शेतात बाळूला ठार केले व पोत्यात भरून पोते शिवले, नंतर पप्पूच्या दुचाकीवर बाळूचे प्रेत नेऊन पाटाच्या पाण्यात टाकले. नंतर त्याची दुचाकीही पाटात फेकली. ही घटना ३0 जानेवारी रोजी रात्री ८ ते ९ वाजेदरम्यान घडली असल्याचे जबाब पोलिसांना मिळाले आहेत. 
दरम्यान, पंकज धनगर याला १0 फेब्रुवारी रोजी रात्री ९.२0 वाजता अटक करण्यात आली.
मयताचा मोबाइल, मारेकर्‍याचा टी-शर्ट हस्तगत करण्यात आला आहे. अंजनी नदीच्या पुलाखाली रक्ताचे डाग असलेला टी-शर्ट पोलिसांना पप्पूने काढून दिला.जवखेडे शिवारातील बापू महाजन यांच्या शेतातील विहिरीतून मयताचा मोबाइल मिळून आला.
पंकजला कोठडी
पंकजला बुधवारी एरंडोल न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. आधीचे संशयित आरोपी सचिन मराठे व पप्पू यांची पोलीस कोठडी उद्या संपणार असल्याने त्यांना पुन्हा कोर्टासमोर उभे करून कोठडी मागण्यात येणार आहे. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाईल. 
पप्पूने पोलिसांना १२ हजार ९00 रुपये रोख काढून दिले. बाळूला ठार करण्यासाठी सचिनने पप्पू व पंकज यांना सुपारीदिली असावी असा संशय आहे. खुनाचे कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे. आरोपींनी पाटाच्या पाण्यात टाकलेल्या काठय़ा व मयताचे बूट अजून सापडलेले नाही.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, अपर पोलीस अधीक्षक संदीप जाधव, पोलीस उपअधीक्षक रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एकनाथ पाडळे, सहायक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक एम.एस. बैसाणे व विजया अलोणे, दिनकर मांडोळे, मेहमूद पिंजारी, सुभाष धाबे हे तपास करीत आहेत. होमगार्ड छोटू पहेलवान यांनी विशेष सहकार्य केले.
(वार्ताहर)

तडाखा..

धरणगाव तालुक्यातील कल्याणेहोळ परिसरात मंगळवारी झालेल्या वादळी पावसामुळे गव्हाचे पीक आडवे पडले आहे. बाळू दामू पाटील यांच्या खुनासाठी वापरलेले काही साहित्य अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाही. त्यांचा शोध सुरू असून यात आणखी कुणाचा समावेश आहे काय? याचाही तपास सुरू आहे.