अमळनेरात पहाटे दरोडा, चाकू लावून सोने व रोकड लुटली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 10:45 IST2025-09-25T10:45:15+5:302025-09-25T10:45:46+5:30
घरातील व्यक्तीला चाकू लावून कपाटातील सुमारे पाच ते सहा तोळे सोने तसेच अंदाजे ४० हजार रुपये रोख लुटून नेले. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.

अमळनेरात पहाटे दरोडा, चाकू लावून सोने व रोकड लुटली
अमळनेर :( जळगाव): घरमालक ड्युटीला निघताच चार जणांनी हातात चाकू घेऊन घरातून सुमारे चाळीस हजार रुपये आणि पाच सहा तोळे सोने लुटून नेले . ही घटना अमळनेरात गुरुवार २५ रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली.
दीपक पुंडलिक पाटील (रा. अयोध्या नगर, बंगालीफाईल, अमळनेर ) हे रेल्वेत नोकरीला आहेत. पहाटे ५ वाजता ते ड्युटीसाठी घरुन निघाले. काही वेळात त्यांच्या घरात चार चोरट्यानी हातात चाकू घेऊन प्रवेश केला. घरातील व्यक्तीला चाकू लावून कपाटातील सुमारे पाच ते सहा तोळे सोने तसेच अंदाजे ४० हजार रुपये रोख लुटून नेले. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. ठसे तज्ज्ञांना बोलावण्यात आले. पंचनामा प्रक्रिया सुरू आहे.