कर्ज मिळत नसल्याने हातेड येथे शेतक:याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2017 12:32 IST2017-06-14T12:32:56+5:302017-06-14T12:32:56+5:30

राहुल रमेश पाटील (35) या तरुण शेतक:याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Due to not getting a loan, farmer at Hadeed: This suicides | कर्ज मिळत नसल्याने हातेड येथे शेतक:याची आत्महत्या

कर्ज मिळत नसल्याने हातेड येथे शेतक:याची आत्महत्या

ऑनलाईन लोकमत

चोपडा, जि. जळगाव, दि. 14 - : चोपडा तालुक्यातील हातेड बु.येथील राहुल रमेश पाटील (35) या तरुण शेतक:याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
13 रोजी सकाळी सहा वाजेपूर्वी  राहुल पाटील याने गावाबाहेर उभा असलेला पाण्याच्या टँकरला दोरी बांधून गळफास घेतला. त्यास उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ.नरेंद्र पाटील यांनी  मृत घोषित केले. याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात डॉ.नरेंद्र पाटील यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 
राहुल पाटील यांच्याकडे  शेती होती. त्यांच्यावर 50 हजारांपयर्ंत सोयासायटीचे कर्ज होते. कर्ज माफ झाले तरी नवीन कर्ज अजून मिळत नाही, पाऊस पडला तरी पेरणी करण्यासाठी पैसे कसे उपलब्ध करू या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Due to not getting a loan, farmer at Hadeed: This suicides