शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

अंधार पडल्याने पथकाने आटोपता घेतला दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 12:34 IST

पारोळ््याच्या उर्वरित भागासह एरंडोल तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा व्यर्थ

जळगाव : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेले केंद्रीय समितीचे दोन सदस्यीय पथक जळगाव जिल्ह्यात पोहचले आणि अंधार पडल्याने हे पथक पारोळा तालुक्यातील केवळ मोंढाळे प्र.अ. येथे रस्त्यावरच पाच मिनिटे थांबून मार्गस्थ झाले. नियोजित दौºयानुसार पारोळा व एरंडोल तालुक्यातील इतर ठिकाणी पथक न पोहचल्याने शेतकºयांची घोर निराशा तर झालीच सोबतच संपूर्ण एरंडोल तालुक्यासह पारोळ््याचा उर्वरित भाग पाहणीपासून वंचित राहिला.दरम्यान, दुपारपासून पथकाची प्रतीक्षा करीत असलेले शेतकरी रात्रीपर्यंत थांबूनही पथक न आल्याने शेतकºयांनी संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे एरंडोल तालुक्यात पथकासाठी शेतरस्तेही तयार करण्यात आले, मात्र पथक न आल्याने अधिकारी, शेतकºयांची प्रतीक्षाही व्यर्थ ठरली.जिल्ह्यात २१ ते २९ आॅक्टोबर २०१९ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे १४६८ गावांमधील ६ लाख १ हजार ३०७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्र शासनाकडून समिती पाठविण्यात आली. केंद्रीय अर्थ मंत्रालयातील खर्च विभागाचे सल्लागार दिना नाथ व जयपूर येथील कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ.सुभाष चंद्रा यांचा समावेश असलेली समितीचा २२ रोजी दौरा सुरू झाल्यानंतर धुळे जिल्ह्यातील पाहणी करून या पथकाने संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात प्रवेश केला. मात्र तोपर्यंत अंधार पडला होता. त्यामुळे अंधारात पाहणी करणे शक्य नव्हते. परिणामी पुढील पाहणी टळणार हे निश्चित होते. झालेही तसेच व या पथकाने केवळ पारोळा तालुक्यातील मोंढाळे प्र.अ. येथे रस्त्यावरच पाच मिनिटे थांबून संवाद साधला आणि काढता पाय घेतला. त्यामुळे येथे शेतकºयांचा अपेक्षाभंग झाला.अंधारात काय समजणार?पथक मुळात उशिरा पोहचल्याने अंधारात नुकसानीचा अंदाज येणे शक्य नव्हते. त्यामुळे पथकाने एकाच गावात थांबून कापसाची पाहणी केल्याचे समिती सदस्य दीना नाथ यांनी सांगितले. अंधार पडल्याने शेतातील नुकसानीचे काय समजणार असा प्रश्न उपस्थित करीत त्यांनी जळगावी मुक्कामी निघालो असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.आज नियोजित दौºयानुसार पाहणीअंधार पडल्याने पारोळ््यातील उर्वरित दोन गावांची व एरंडोल तालुक्यातील ३ गावांची पाहणीच होऊ शकली नाही. दुसºया दिवशीही या तालुक्यात पाहणी होणार नसल्याचे सांगण्यात आले असून २३ रोजी नियोजित दौºयानुसार पाहणी करणार असल्याचेही पथकाच्यावतीने सांगण्यात आले.आज चार तालुक्यांमध्ये पाहणीहे पथक २३ रोजी सकाळी ८.३० वाजता शिरसोलीमार्गे पाहणीसाठी रवाना होणार आहे. यामध्ये जळगाव तालुक्यातील ३, पाचोरा तालुक्यातील ४, भडगाव तालुक्यातील २, चाळीसगाव तालुक्यातील ३ गावांमध्ये पिकांच्या नुकसानीची पाहणी करून औरंगाबादमार्गे अहमदनगरकडे रवाना होईल.

टॅग्स :Jalgaonजळगाव