शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

संचालकांकडून रुग्णालय प्रशासनाची खरडपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 11:57 AM

जळगाव : कोरोना रुग्णालयात दिवसेंदिवस बाधितांचे वाढलेले मृत्यू यावरून मंगळवारी वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ़ तात्याराव लहाने यांनी स्थानिक कोविड ...

जळगाव : कोरोना रुग्णालयात दिवसेंदिवस बाधितांचे वाढलेले मृत्यू यावरून मंगळवारी वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ़ तात्याराव लहाने यांनी स्थानिक कोविड रुग्णालय प्रशासनाची चांगलीच खरडपट्टी केली. योग्य औषधोपचार होत नसल्याचा ठपका ठेवत नेमके कसे उपचार करावेत, याची माहिती डॉ़ लहाने यांनी मंगळवारी अधिष्ठतांसह डॉक्टरांना दिली.कोरोना रुग्णालयात गेल्या आठवडाभरात ३३ तर सोमवारी एकाच दिवसात तब्बल १३ मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली़ ही बाब अत्यंत धक्कादायक असून मृत्यूदर हा शंभराकडे वाटचाल करीत असल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे़कोविड रुग्णालयात मनुष्यबळाचा मुद्दा वांरवार समोर आला आहे़ सद्यस्थितीत मनुष्यबळाची अत्यंत कमतरता असल्याचा मुद्दा या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मांडण्यात आला़ मात्र, डॉ़ लहाने यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले नाही़ आहे त्या सोर्सेसमध्येच योग्य उपचार करा, असे त्यांनी सांगितल्याची माहिती समोर आली आहे़ त्यामुळे स्थानिक डॉक्टरांपुढेही मोठा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे़कारवाईचा इशाराकोविड रुग्णालयात सध्या एका डॉक्टरकडे पाच कक्षांची जबाबदारी असल्याने हा भार खूपच असून यामुळे वैद्यकीय सुविधा पुरविण्यास अडचणी उद्भवत असल्याचे चित्र आहे़ दरम्यान, मंगळवारच्या व्हिसीत डॉ़ लहाने यांनी काही डॉक्टरांवर कारवाईचा इशाराही दिला आहे़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव