शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

नवरा नकोच, प्रियकरच हवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:57 IST

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहूर येथील २६ वर्षीय महिलेचे याच गावाच्या शेजारी सहा कि.मी. अंतरावर असलेल्या एका खेडेगावातील २४ वर्षीय ...

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहूर येथील २६ वर्षीय महिलेचे याच गावाच्या शेजारी सहा कि.मी. अंतरावर असलेल्या एका खेडेगावातील २४ वर्षीय अविवाहित तरुणासोबत लॉकडाऊन काळात सूत जुळले. दोघांचे प्रेम इतके बहरले की, त्यांनी पलायन करून संसार थाटण्याचा निर्णय घेतला. १९ जानेवारी रोजी महिला पहूर येथून जळगावात आली, तर तरुण आधीच येथे थांबलेला होता. बसने दोघांनी थेट नाशिक गाठले. तरुणाने दोन महिने आधीच नाशिकमध्ये कंपनीत कामाची व्यवस्था व राहायला भाड्याने घर घेऊन ठेवले होते. तेथे ते संसाराला लागलेले असतानाच दुसरीकडे पत्नी घरी नाही म्हणून पती, तिची मुले हैराण झाली. त्यांनी पहूर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद केली. तेथून प्रकरण पुढे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याकडे आले. उपनिरीक्षक रवींद्र गिरासे, सहायक फौजदार विजय पाटील, दिनेश बडगुजर, नरेंद्र वारुळे व संदीप सावळे यांनी विवाहितेचा छडा लावला. पहूरचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी उपनिरीक्षक अमोल देहडे व शशिकांत पाटील यांचे पथक तातडीने रवाना केले. सोमवारी या पथकाने विवाहितेला शोधून काढले असता पोलिसांनाही धक्का बसला. तिने तिच्यापेक्षाही वयाने लहान असलेल्या अविवाहित तरुणासोबत संसार थाटला होता. पतीच्या घरी येण्यास विवाहितेने स्पष्ट नकार दिला. कारण विचारले तर पती सतत दारू पितो व मारहाण करतो म्हणून तो नकोच, असा पवित्रा घेऊन मुलांचाही तिने त्याग केला. त्यामुळे तिचा जबाब घेऊन पोलीस माघारी फिरले.