उत्तर महाराष्ट्रात दहावी परीक्षेत धुळे अव्वल

By Admin | Updated: June 13, 2017 13:17 IST2017-06-13T13:17:15+5:302017-06-13T13:17:15+5:30

जळगाव जिल्ह्याचा निकाल 87.78 टक्के तर नंदुरबारचा 86.38 टक्के निकाल

Dhule tops in 10th examination in North Maharashtra | उत्तर महाराष्ट्रात दहावी परीक्षेत धुळे अव्वल

उत्तर महाराष्ट्रात दहावी परीक्षेत धुळे अव्वल

 ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.13 - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ ,पुणे यांच्यातर्फे मार्च 2017 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत उत्तर महाराष्ट्रातून धुळे जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक 89.79 टक्के राहिला. तर त्यापाठोपाठ जळगाव जिल्ह्याचा 87.78 तर नंदुरबारचा 86.38 निकाल राहिला.
दहावीच्या परीक्षेत उत्तर महाराष्ट्रातून दोन लाख 2 हजार 478 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.  त्यापैकी एक लाख 77 हजार 603 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  नाशिक जिल्ह्याचा 87.42 टक्के निकाल लागला आहे. जळगाव जिल्ह्यातील 61 हजार 825 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 54 हजार 267 विद्यार्थी पास झाले. धुळे जिल्ह्यातील 28 हजार 732 विद्याथ्र्यापैकी 25 हजार 799 विद्यार्थी पास झाले. तर नंदुरबार जिल्ह्यातील 20 हजार 742 पैकी 17 हजार 917 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तर महाराष्ट्रातून 88 हजार 126 विद्यार्थीनींनी दहावी परीक्षा दिली होती. त्यापैकी 79 हजार 922 विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत. यावर्षी देखील मुलांच्या तुलनेत मुलींनी बाजी मारली आहे. 

Web Title: Dhule tops in 10th examination in North Maharashtra