मुक्ताईनगर तालुक्यात हरणांच्या कळपाची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 06:06 PM2019-11-17T18:06:48+5:302019-11-17T18:09:20+5:30

हरणांच्या कळपाने रस्त्याने मोटारसायकलवर येणाऱ्या तीन जणांना धडक दिली. त्यात दोन जण गंभीर जखमी झाले

Deer flock in Muktinagar taluka | मुक्ताईनगर तालुक्यात हरणांच्या कळपाची धडक

मुक्ताईनगर तालुक्यात हरणांच्या कळपाची धडक

Next
ठळक मुद्दे चिंचखेडा खुर्द गावाजवळील घटनाचिंचखेडा खुर्द : दोन गंभीर, एक किरकोळ जखमी

मुक्ताईनगर, जि.जळगाव : हरणांच्या कळपाने रस्त्याने मोटारसायकलवर येणाऱ्या तीन जणांना धडक दिली. त्यात दोन जण गंभीर जखमी झाले असून, तिसरा किरकोळ जखमी आहे. ही घटना शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास चिंचखेडा खुर्द गावाजवळील नाल्याजवळ कुºहा खांडवी रस्त्यावर घडली.
सूत्रांनुसार, तालुक्यातील कुºहा काकोडा येथील दिलीप महादेव गोसावी, गणेश अशोक गोरले व विजय नंदेवार हे तीन जण खामगाव येथून मोटार सायकलने कुºहा येथे येत होते. ते येत असताना शनिवारी रात्री अचानक हरणांचा कळप त्यांना रस्त्यात आडवा आला. यामुळे मोटारसायकलवरील तिघे जण थांबले. हरणांचा कळप आणि मोटारसायकलस्वार आमने-सामने आले. चारही बाजूंनी असलेल्या हरणांनी मोटारसायकलस्वारांना धडक दिली. त्यात तिघेही जखमी झाले. त्यातील दिलीप महादेव गोसावी (वय ३५), तर गणेश अशोक गोरले (वय ३५) हे गंभीर जखमी झाले असून, विजय नंदेवार हे किरकोळ जखमी झाले.
हरणांनी धडक दिल्यानंतर बराच वेळ ते रस्त्यावरच जखमी अवस्थेत बेशुद्धावस्थेत पडून होते. ही बाब निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना उचलून वढोडा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात उपचारासाठी आणले. परंतु हे उपकेंद्रही बंद होते. यानंतर ग्रामस्थांनी त्यांना मलकापूर येथे खासगी रुग्णालयात हलविले.
जखमींची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. उपचारासाठी पैसे नसल्याने दोघे घरी परतले. अशा परिस्थितीत वनविभागाने जखमींना तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी जखमींच्या नातेवाईकांसह नागरिकांनी केली आहे.
कुºहा ते खांडवी रस्त्यावर मुक्ताईनगर तालुका अंतर्गत येणारे वढोदा वनपरिक्षेत्र आहे. यामुळे या रस्त्यावर वन्यजीव प्राण्यांची नेहमीच वर्दळ असते. रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांच्या शेतांचे नुकसानदेखील वन्य प्राण्यांमुळे होत असते. तसेच हरिण, सांबर, काळवीट यासारखे तृणभक्षी प्राणी हे रस्ता ओलांडून दुसºया शेतांमध्ये जात असताना असे प्रकार अनेक वेळेस घडत आहेत.

Web Title: Deer flock in Muktinagar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.