निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:17 IST2021-05-06T04:17:54+5:302021-05-06T04:17:54+5:30

जळगाव : दत्तात्रय नारायण धर्माधिकारी (७८, रा.नशिराबाद ) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा गुरुवारी सकाळी ९ वाजता ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

जळगाव : दत्तात्रय नारायण धर्माधिकारी (७८, रा.नशिराबाद ) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा गुरुवारी सकाळी ९ वाजता राम मंदिर येथून निघेल. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. दैनिक लोकमतचे पत्रकार प्रसाद धर्माधिकारी, पांडुरंग धर्माधिकारी, प्रमोद धर्माधिकारी यांचे वडील तर श्रीराम मंदिराचे अर्चक मंगल महाराज धर्माधिकारी व राजेश्वर धर्माधिकारी यांचे बंधू होत.

=======

सुरेखाबेन शाह

जळगाव : सुरेखाबेन केशवलाल शाह (७८) यांचे बुधवारी रोजी संध्याकाळी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मोठे बंधू आहेत. त्या आनंदीभाई नटवरलाल व दिनेश भाई यांच्या बहीण होत.

======

वसंतराव बाविस्कर

जळगाव : वसंतराव धर्मा बाविस्कर (७३, रा. द्रोपदी नगर) यांचे बुधवारी सायंकाळी झाले. अंत्ययात्रा गुरुवारी सकाळी नऊ वाजता राहत्या घरून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. गिरीश बाविस्कर यांचे ते वडील होत.

======

Web Title: Death talk