निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:17 IST2021-04-04T04:17:18+5:302021-04-04T04:17:18+5:30

जळगाव : मधुकर पाटील (रा. वाघोदा बुद्रुक) यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

जळगाव : मधुकर पाटील (रा. वाघोदा बुद्रुक) यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. संजय पाटील यांचे ते वडील होत.

===================

बाळासाहेब चव्हाण

जळगाव : ग. स. सोसायटीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण (८२, रा. जळगाव) यांचे निधन झाले. ते जिल्हा परिषदमधील सेवानिवृत्त कर्मचारी होते.

==================

पांडुरंग पाटील

जळगाव : पांडुरंग पाटील (रा. आव्हाणे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली व मुलगा असा परिवार आहे.

==============

चावदास सपकाळे

जळगाव : भुसावळ येथील सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी चावदास सपकाळे (कोळी) (८२, रा. भोळेनगर) यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, दोन मुली, जावई तसेच नातवंड असा परिवार आहे. डी. सी. कोळी यांचे ते वडील होत.

Web Title: Death talk