शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेर पालिकेच्या 17 जणांवर गुन्हा

By admin | Updated: September 19, 2015 00:12 IST

वृक्षतोड : नगरसेवकांसह कर्मचा:यांचा समावेश

अमळनेर : बनावट दस्तावेज तयार करून नगरपालिका आवारातील मालकीच्या मच्छिमार्केटमधील झाडे लिलावात विकून न्यासभंग केल्याप्रकरणी पालिकेच्या पदाधिका:यांसह 17 कर्मचा:यांविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगरपरिषदेच्या मालकीच्या भूखंड क्रमांक 60/1 व 108 मधील झाडे तोडणे व विक्रीबाबत 15 मे 2015 च्या टिपणी अहवालावर मुख्याधिकारी व अध्यक्षांच्या मंजुरीच्या सह्या न करता वृत्तपत्रातील जाहिरात प्रशासकीय अधिका:यांऐवजी वृक्ष प्राधिकरण समितीच्या अध्यक्षांनी प्रसिद्ध केली. लिलावाची जाहीर नोटीस वृत्तपत्राऐवजी साध्या कागदावर प्रसिद्ध केल्याची तक्रार आहे. तसेच कोणताही परवाना नसताना आझम सादिक मेवाती यांना झाडे विक्री केली. लिलाव खर्डावर लिलावात बोली बोलणा:यांची एकच स्वाक्षरी असून इतरांच्या स्वाक्ष:या नाहीत. प्रशासन अधिकारी संजय चौधरी, न.पा. कर्मचारी संजय पाटील, पाणीपुरवठा अभियंता श्याम करंजे आणि अध्यक्षांची सही असून मुख्याधिका:यांची सही नाही व करंजे यांच्या स्वाक्षरीखाली 1 जुलै 15 अशी तारीख नमूद केली. तसेच 29 जून रोजी प्रशासन अधिकारी निवडणूक कामात असताना त्यांच्या अनुपस्थित लिलाव करण्यात आला.

नगरपालिकेच्या लाखो रुपयांच्या झाडांची रक्कम गैरमार्गाने चुकीचे दस्तावेज तयार करून शासकीय मालमत्ता त्यांच्या ताब्यात दिली असताना न्यासभंग केला व बनावटीकरण केले, अशी फिर्याद नगरसेविका नीता नीलेश भांडारकर यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला दिली.

त्यावरून भारती चौधरी, श्रीराम चौधरी, साहेबराव पवार, स्वाती पाठक, अनिल महाजन, सखुबाई भिल, संजय चौधरी, श्यामकुमार करंजे, संजय पाटील, आझम मेवाती, लाडका गुलाम हुसेन मेवाती, प्रल्हाद पाटील, हिंमत चौधरी, ईस्माईखॉ मेवाती, अजिम मेवाती, देवीदास चौधरी, मुकुंदा पाटील यांच्याविरुद्ध भादंवि 120,167, 408, 465, 468, 471, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक उदयसिंग साळुंखे करीत आहेत.

(वार्ताहर)