शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात 40 हजार हेक्टरवर कापसाची लागवड

By admin | Updated: June 14, 2017 17:22 IST

कोरडवाहू कापसाची लागवड मात्र थांबली आहे

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 14 - जिल्हाभरात आतार्पयत विविध खरीप पिकांची 52 हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. त्यात एकटय़ा कापसाची 40 हजार हेक्टरवर लागवड झाली असून, या क्षेत्रात पूर्वहंगामी किंवा बागायती कापसाचे क्षेत्र 35 हजार हेक्टर एवढे आहे. कोरडवाहू कापसाची लागवड मात्र थांबली आहे. मान्सूनपूर्व पाऊस सर्वत्र बरसला. परंतु मागील दोन दिवसांपासून पाऊस नाही. काही भागात तुरळक पाऊस सुरू आहे. जिल्हाभर मान्सूनपूर्व पाऊस झाल्यानंतर मशागतीची कामे गतीने झाली. परंतु नंतर पावसाबाबत अनुकूल स्थिती नसल्याने पेरण्या थांबल्या. तापीकाठावरील काही भागामध्ये पेरण्या झाल्या. या भागाचा अपवाद वगळता इतरत्र पेरण्या झालेल्या नाहीत. कडधान्य, तृणधान्य, गळीत धान्य यांची पेरणी किंवा लागवड थांबली आहे. सोयाबीन, तूर या पिकांना उगवणीसाठी 40 मि.मी.पेक्षा अधिक पावसाची गरज असते. पण एवढा पाऊस मागील दोन दिवसात नसल्याने पेरण्या थांबल्या आहेत. शेतकरी पुरेशा पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पेरणीसाठी 40 मि.मी. पावसाची गरज असते. एवढा पाऊस मागील आठवडय़ात काही तालुक्यांमध्ये झाला. नंतर मात्र पाऊस नाही. सद्य:स्थितीत पेरणी टाळावी. आणखी पाऊस बरसल्यानंतर पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. जिल्हाभरात 52 हजार हेक्टरवर पेरण्या झालेल्या असल्या तरी त्यात एकटय़ा कापसाचे क्षेत्र 40 हजार हेक्टर आहे. उर्वरित 12 हजार हेक्टरवर सोयाबीन, ज्वारी, तूर, उडीद मूग या पिकांची पेरणी झाली आहे. 35 हजार हेक्टरवर पूर्वहंगामी (बागायती) कापसाची लागवड झाली आहे. कृत्रीम जलसाठा उपलब्ध असलेले शेतकरी कापूस लागवड करीत आहेत. कापसाची लागवड सुरूच आहे. पण कोरडवाहू शेतक:यांनी मात्र कापसाची लागवड सुरू केलेली नसल्याचे चित्र आहे. कोरडवाहू कापसाची लागवड मागील अठवडय़ात काही भागात झाली. त्याची आकडेवारी पाच हजार हेक्टर्पयत असल्याचा अंदाज आहे.