Cleaning by drainage municipality near the tunnel | पारोळ््यात बोगद्याजवळील नाल्याची पालिकेने केली साफसफाई
पारोळ््यात बोगद्याजवळील नाल्याची पालिकेने केली साफसफाईपारोळा : पारोळा येथील बस स्थानक परिसरातील बोगद्याजवळील नाल्यात घाण अडकल्याने नाला ब्लॉक झाला होता. त्यात एक जण पडून जखमी झाला होता. याबाबती वृत्त ‘लोकमत’ने १८ सप्टेंबर रोजीच्या अंकात प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन यावर नगर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या सफाई कर्मचा-यांनी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास नाल्यातील अडकलेली घाण काढली व संपूर्ण नाला साफ केला. त्यामुळे वरून वाहणारे पाणी नाल्याच्या पाईपमधून सुरळीत वाहत होते. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच पाण्यामुळे पडलेला खड्डादेखील मुरुमाच्या साह्याने बुजावण्यात येणार आहे.


Web Title: Cleaning by drainage municipality near the tunnel
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.