शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

उघडय़ावर बसणा:यांचा गुलाब पुष्प देऊन गौरव

By admin | Updated: January 11, 2017 00:45 IST

यावल नगरपालिकेच्या वतीने गांधीगिरी करीत उघडय़ावर नैसर्गिक विधीस बसलेल्या नागरिकांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

यावल : स्वच्छ महाराष्ट्र अभियांनाअंतर्गत शहर हगणदरीमुक्त मोहिमेत  यावल  नगरपालिकेच्या वतीने गांधीगिरी करीत उघडय़ावर  नैसर्गिक विधीस बसलेल्या नागरिकांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. या घटनेने उघडय़ावर  बसणा:यांमध्ये खळबळ उडाली आहे. पुढील आठवडय़ात मोहीम अधिक तीव्र करून कारवाईची तीव्रता वाढविण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांनी सांगितले.स्वच्छ महाराष्ट्र अभियांना अंतर्गत यावल  नगरपालिकेने  जानेवारी अखेर र्पयत शहर हगणदरीमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. शहरातील  सात हजार 736 कुटुंबीयांपैकी  एक हजार 809 कुटुंबीयाकडे शौचालय नसल्याचे सव्रेक्षणात  आढळून आले आहे. त्यापैकी गेल्या वर्षभरात 533 शौचालये पूर्ण  करण्यात येऊन सध्या  689 शौचालयांची  कामे प्रगतीपथावर आहेत.  उर्वरित 587 लोकांनी शौचालयांचे प्रस्ताव पालिकेकडे दाखल केले असल्याचे मुख्याधिकारी आढाव यांनी सांगितले.शौचालयांची कामे अत्यंत जलद गतीने सुरू असल्याचे सांगत ज्यांच्याकडे जागा उपलब्ध  आहे. परंतु शौचालय नाही अशाकडे वारंवार पालिकेचे कर्मचारी जात आहेत. दररोज नवीन  40-50 शौचालयाचे  कामे सुरू करीत असल्याचे आढाव यांनी सांगितले.   उघडय़ावर बसत असलेल्यांना वारंवार सांगूनही  ते ऐकत नसल्याने सध्या  त्यांचा गुलाबपुष्प देऊन गौरव करण्याचा पालिकेचा उपक्रम सुरू आहे. यानंतरही  नागरिकांनी ऐकले नाही तर त्यांना नोटिसा बजावण्यात येतील. शिवाय  कायद्यान्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. पालिकेकडून त्यांना कोणताही दाखला देण्यात येणार नाही. ही कटू कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्याधिकारी आढाव यांनी  केले.  (वार्ताहर)