भाजपच्या ‘त्या’ कार्यकर्त्याचा पुन्हा भरचौकात गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:17 IST2021-04-04T04:17:09+5:302021-04-04T04:17:09+5:30

जळगाव : भाजपच्या माजी मंत्र्यांना शिवीगाळ करणाऱ्या ‘त्या’ कार्यकर्त्याने शनिवारी सायंकाळी सात वाजता टॉवर चौकात चांगलाच गोंधळ घातला. स्वतःच्या ...

BJP's 'that' worker's confusion again | भाजपच्या ‘त्या’ कार्यकर्त्याचा पुन्हा भरचौकात गोंधळ

भाजपच्या ‘त्या’ कार्यकर्त्याचा पुन्हा भरचौकात गोंधळ

जळगाव : भाजपच्या माजी मंत्र्यांना शिवीगाळ करणाऱ्या ‘त्या’ कार्यकर्त्याने शनिवारी सायंकाळी सात वाजता टॉवर चौकात चांगलाच गोंधळ घातला. स्वतःच्या अंगावरील कपडे काढून पोलिसांना शिवीगाळ केली; तसेच चौकातील पोलिसांच्या दुचाकी फेकून दिल्या. या प्रकारामुळे टॉवर चौकात मोठी गर्दी जमा झाली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपूर्वी या कार्यकर्त्यांनी भाजपच्या एका माजी मंत्र्यांना शिवीगाळ केली होती, त्यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. शनिवारी टाॅवर चौकात गस्तीवर असलेल्या पोलिसांना पाहून या कार्यकर्त्याने शिव्यांची लाखोली वाहिली, त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या दुचाकी फेकून दिल्या. त्याला आवरायला गेलेल्या पोलिसांनाही त्याने शिवीगाळ करून अंगावरील कपडे काढले. हा कार्यकर्ता मद्याच्या नशेत असल्याचे सांगण्यात आले. साधारण एक ते दीड तास हा गोंधळ सुरू होता. शहर पोलीस ठाण्याच्या बाहेर त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. शेवटी कपडे घालून त्याला रवाना करण्यात आले. या प्रकारामुळे लोकांची मोठी गर्दी व करमणूक झाली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कुठलीही कारवाई केली नाही.

Web Title: BJP's 'that' worker's confusion again