शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

'अवकाळी'च्या तडाख्याने बेहाल

By admin | Updated: March 2, 2015 13:07 IST

बेमोसमी पावसाने काही दिवसांच्या विश्रांतीनंतर शहरासह परिसरात शनिवारी व रविवारी जोरदार तडाखा दिल्याने नागरिक बेहाल झाले.

जळगाव : बेमोसमी पावसाने काही दिवसांच्या विश्रांतीनंतर शहरासह परिसरात शनिवारी व रविवारी जोरदार तडाखा दिल्याने नागरिक बेहाल झाले. सलग दुसर्‍या दिवशीही पावसाचा जोर कायम होता. या पावसाचा सर्वाधिक तडाखा शिवतीर्थ मैदानावरील मुक्ताई सरसमधील बचत गटांना बसला. तसेच कृषि उत्पन्न बाजारातील धान्याची पोती पाण्याने भिजल्याने नुकसान झाले. तसेच बहुतांश भागातील फीडर ट्रिप झाल्याने शनिवारी मध्यरात्रीपासून अनेक भागातील विद्युत पुरवठा रविवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत खंडित होता. त्यानंतरही दिवसभर विजेचा लपंडाव सुरु होता. ठिकठिकाणी साचले पाण्याचे तळे
शनिवारी रात्री साडेआठ वाजता पावसाला सुरुवात झाली. रात्री अकरा वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. त्यानंतर काही वेळ पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर पुन्हा रात्री १ वाजेच्या सुमारास पावसाने जोर धरला. रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. शहरातील सखल भागात ठिकठिकाणी पाण्याचे तळे साचले होते.
परिस्थिती पाहून निर्णय घ्या!
रविवारी सकाळपासून पाऊस सुरू झाल्यामुळे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रवीण देवरे यांनी जि.प.चे 'सीईओ' आस्तिककुमार पांडेय यांच्याशी संपर्क साधून प्रदर्शनस्थळी व्यावसायिकांचे हाल होत असल्याची माहिती दिली. त्यामुळे प्रदर्शन बंद करायचे का? अशी विचारणा केली असता सीईओ पांडेय यांनी तेथील परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा, असे सांगितले. प्रदर्शनाच्या ठिकाणी चिखल मोठय़ा प्रमाणात साचला आहे. प्रदर्शनाच्या समारोपाला अद्याप दोन दिवस बाकी असले तरी आता व्यवसाय होणे आता अशक्य आहे. शनिवारी रात्रभर झालेल्या पावसामुळे शिवतिर्थ मैदानावर प्रचंड चिखल झाल्याने मुक्ताई सरस महोत्सवात सहभागी झालेल्या बचत गटांचे प्रचंड हाल झाले.

'मुक्ताई सरस'मध्ये सहभागी बचत गटांची झालेली दैना. धान्याचे नुकसान 
अजिंठा रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेडबाहेर रस्त्यावर ठेवण्यात आलेल्या गहू, मका व इतर धान्याच्या गोण्या पावसाच्या पाण्याने भिजल्याने मोठे नुकसान झाल्याची भीती व्यापार्‍यांनी व्यक्त केली आहे. 
क्रिकेटचे सामने रद्द
सिव्हिल इंजिनिअर असोसिएशनतर्फे कन्स्ट्रक्शन क्रिकेट लिगला शनिवारपासून सागर पार्क मैदानावर सुरुवात झाली. पावसामुळे मैदानाची पूर्णत: वाट लागली असून रविवारी दिवसभरात होणार्‍या दोन उपांत्य फेरी व अंतिम फेरीचे सामने रद्द केले आहे. ही स्पर्धा आता बुधवारी होईल, अशी माहिती 'क्रेडाई'चे धनंजय जकातदार यांनी दिली. अवकाळी पावसामुळे मुक्ताई सरसमध्ये सहभागी झालेल्या बचत गटांचे हाल झाले. अनेक गटांना प्रदर्शन मध्येच सोडून घरी जावे लागले. 
-प्रवीण देवरे, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान 
शनिवारी व रविवारी झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा व दादरचे प्रचंड नुकसान झाले आहे. ही सर्वच पिके हातात आली असताना अवकाळीच्या तडाख्याने मोठे नुकसान झाले आहे. ममुराबाद, कानळदा, फुपनगरी, आव्हाणे परिसरातील गहू आडवा पडला आहे. परिणामी यंदा पुन्हा एकदा गहू, हरभर्‍याची प्रत खराब होणार आहे. आधीच शेतकरी संकटात असताना आता पुन्हा आपत्ती कोसळली आहे. शिवाजीनगर पुलाकडून गेंदालाल मिलकडे जाणार्‍या रस्त्यावर रविवारी असे पाणी साचलेले होते. १६0 बचत गट घराकडे रवाना प्रदर्शनस्थळी सर्वत्र चिखल झाला होता. येथील परिस्थिती पाहून अनेक विक्रेते आपला माल जमा करून रविवारी सकाळीच घराकडे रवाना होताना दिसून आले. दुपारी दोन वाजेपर्यंत २00 पैकी १६0 बचत गटांनी आपले स्टॉल सोडले होते. 
मुक्ताई सरसमधील बचत गटांचा माल भिजला
या अवकाळी पावसाचा सर्वाधिक तडाखा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे शिवतीर्थ मैदानावर भरलेल्या मुक्ताई सरसमध्ये सहभागी झालेल्या बचत गटांना बसला. दोन पैसे मिळावे यासाठी जिल्ह्याच्या कान्याकोपर्‍यातून आलेल्या काही बचत गटांचा माल ओला चिंब झाल्याने नुकसान झाले.