जितेंद्र माळी यांना पीएचडी प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 20:35 IST2021-03-04T20:35:01+5:302021-03-04T20:35:09+5:30

जळगाव - मारवड येथील नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयातील सरंक्षण आणि सामरिक शास्त्र विषयाचे विभाग प्रमुख प्रा. जितेंद्र ...

Awarded PhD to Jitendra Mali | जितेंद्र माळी यांना पीएचडी प्रदान

जितेंद्र माळी यांना पीएचडी प्रदान

जळगाव - मारवड येथील नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयातील सरंक्षण आणि सामरिक शास्त्र विषयाचे विभाग प्रमुख प्रा. जितेंद्र आनंदा माळी यांना नुकतीच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून पीएचडी प्रदान करण्यात आली आहे. ही पदवी प्र-कुलगुरू प्रा.पी.पी.माहुलीकर यांच्याहस्ते देण्यात आली.
भारत-अमेरिका सामरिक संबंध आणि त्यांचा भारताच्या सुरक्षेवर होणार परिणाम - एक अभ्यास या विषयावर त्यांनी शोधप्रबंध सादर केला आहे. त्यांना थाळनेर येथील पी.एस.वाडीले महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ. विजय जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या यशाबद्दल गुरूवारी त्यांचा उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. सतीष देशपांडे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

 

Web Title: Awarded PhD to Jitendra Mali