शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात केळी लागवडीचे क्षेत्रफळ वाढले

By admin | Updated: April 7, 2017 16:59 IST

भूगर्भातील पाण्याचा स्त्रोतावर आधारीत कूपनलिका व विहिरींच्या पाणी पातळीच्या नियोजनावर नवीन लागवड करण्याचे तंत्र अवलंबून आहे.

जळगाव, दि. 7 - केळीसाठी   प्रसिद्ध असलेल्या  जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक क्षेत्रफळ रावेर तालुक्याने  व्यापले आहे. मात्र किरकोळ ठिकाणी नवीन लागवड करण्याचा अपवाद वगळता क्षेत्रफळाच्या तुलनेत लागवड शून्य आहे. भूगर्भातील पाण्याचा स्त्रोतावर आधारीत कूपनलिका व विहिरींच्या पाणी पातळीच्या नियोजनावर नवीन लागवड करण्याचे तंत्र अवलंबून आहे.जिल्ह्यातील केळी लागवडीचे एकूण क्षेत्रफळ सन 2015-2016 मध्ये 48 हजार 280 हेक्टर एवढे  होते. 2016-2017 मध्ये  त्यात वाढ होऊन ते सुमारे 51 हजार  हेक्टर क्षेत्रफळ  इतके झाले आहे. यात सर्वाधिक क्षेत्रफळ व्यापणारा रावेर तालुक्याची व्याप्ती 19 हजार 773 हेक्टर क्षेत्रफळ सर्वसाधारण केळीने व्यापले आहे. एवढय़ा क्षेत्रफळातील केळी आता पुढे कापणीस सज्ज झाली असून पाणीपुरवठा व उन्हापासून बचाव करण्यासाठी शेतक:यांची रंगीत तालीम सुरू झाली आहे.  एप्रिल महिन्यात  नवीन केळी लागवड करण्यास शेतकरी फारसा धजावत नाही. कारण  पावसाळा व हिवाळा या ऋतुमध्ये नवीन केळी व जुनारीमधील रब्बीचे आंतर पीक मका, गहू व हळद, तूर या पिकांचे पाणी भरण्याचे नियोजन करून पाणी देणे शक्य होते. हिवाळय़ातील चार महिन्यांमध्ये केळी बागेला सतत पाण्याची गरज नसते.  अनेक शेतक:यांच्या जमिनी आजही तयार आहे. परंतु पाण्याच्या नियोजना अभावी लागवड उशिरा केली जात आहे. रामनवमीला केली जाते लागवड रावेर व यावल तालुक्यात काही भागात रामनवमीनंतर केळी लागवडीचा  मुहूर्त काही शेतकरी साधतात. याला शेतकरी भाषेत रामबाग म्हणून ओळखले जाते.देशी बियाणे झाले हद्दपार..केळी लागवडीत सध्या टिश्युकल्चर  ग्रॅडनेन या जातीने शेतक:यांना भुरळ घातली आहे. टिश्युच्या प्रथम कापणीनंतर निघणा:या कंद लागवडवर आजही सामान्यत 70 टक्के शेतकरी अवलंबून आहे. यापूर्वीचे देशी वाण श्रीमंती, अर्धापुरी, वसई, सातमासी श्रीमंती या देशी वाणांची उत्पादक क्षमता कमी असल्याची केवळ ओरड  केली जाते. मात्र दर्जा, गोडवी व कोणत्या तरी वातावरणात उन्हामध्ये कमी-अधिक पाण्याचा ताण सहन करणा:या देशी वाणांच्या जाती विकसित करण्यासाठी कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. यामुळे अत्यंत तकलादू व विविध रोगांना बळी पडणा:या टिश्युकल्चर ग्रॅडनेन या विदेशी जातीला प्राधान्य दिले जात आहे.