मनपा अतिक्रमण विभागासाठी सहा अभियंत्यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:16 IST2021-04-17T04:16:18+5:302021-04-17T04:16:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर अपुऱ्या मनुष्यबळाअभावी नियम माेडणाऱ्यांवर कारवाई करता येत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ...

Appointment of six engineers for Municipal Encroachment Department | मनपा अतिक्रमण विभागासाठी सहा अभियंत्यांची नियुक्ती

मनपा अतिक्रमण विभागासाठी सहा अभियंत्यांची नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर अपुऱ्या मनुष्यबळाअभावी नियम माेडणाऱ्यांवर कारवाई करता येत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहा अभियंत्यांची महापालिकेत नियुक्ती केली आहे. अतिक्रमण पथकास साह्य करण्याचे महत्त्वाचे काम या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केले जाणार आहे.

महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी शासकीय विभागांकडील अधिकारी व कर्मचारी पुरविण्याची विनंती केली हाेती. त्यानुसार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागाचे उपकार्यकारी अभियंता संजय घनश्याम निकुंभ, शाखा अभियंता गिरीश सूर्यवंशी, अभिषेक सूर्यवंशी, अमित राजपूत, कनिष्ठ अभियंता, जितेंद्र चव्हाण, सहायक अभियंता साैरभ तिवारी यांची महापालिकेत नियुक्ती केली आहे. या सर्व अधिकाऱ्यांनी १७ एप्रिल राेजी सकाळी १० वाजता आयुक्तांकडे रुजू हाेण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Appointment of six engineers for Municipal Encroachment Department