शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

२६ डिसेंबरला दिसणार ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 22:10 IST

जळगाव : तब्बल एक दशकानंतर २६ डिसेंबरला कंकणाकृती सूर्यग्रहण अर्थात ‘रिंग आॅफ फायर’ दिसणार आहे़ निसर्ग व अंतराळाशी नाते ...

जळगाव : तब्बल एक दशकानंतर २६ डिसेंबरला कंकणाकृती सूर्यग्रहण अर्थात ‘रिंग आॅफ फायर’ दिसणार आहे़ निसर्ग व अंतराळाशी नाते जोडणारी ही दुर्मिळ संधी देशवासीयांसह जळगावकरांना सुध्दा अनुभवायला मिळणार आहे़ त्यानिमित्ताने शहरातील कुतूहल फाउंडेशनतर्फे सुरक्षित सूर्यग्रहण अभियान राबविण्यात येणार आहे़ सूर्यग्रहणाकडे अंधश्रध्दा म्हणून न बघात वैज्ञानिक दृष्टीकोनातून बघावा, असेही आवाहन करण्यात आले आहे़गुरूवार, २६ डिसेंबर रोजी सकाळी सुमारे ८ वाजता सूर्यग्रहणाला सुरूवात होणार असून सकाळी ११ वाजेपर्यंत चालणार असल्याची माहिती मिळाली आहे़ संपूर्ण जगातून हे सूर्यग्रहण भारतात सर्वाधिक चांगले दिसणार आहे़ त्यामुळे जगभरातून अनेक खगोलप्रेमी मंडळी त्या दरम्यान भारतात येणार आहेत. दरम्यान, जळगावात ६८़२१ टक्के कंकणाकृती ग्रहण दिसेल़पीपीटी शो, कार्यशाळेतून दिली जाणार माहितीकंकणाकृती सूर्यग्रहण डिसेंबर महिन्यात दिसल्यानंतर तब्बल १४ ते १५ वर्षांनंतर पुन्हा बघायला मिळणार आहे़ हे दुर्मिळ सौंदर्य सुरक्षितपणे बघावे, यासाठी शहरातील कुतूहल फाउंडेशनच्यावतीने जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्थांमध्ये सुरक्षित सूर्यग्रहण अभियानातंर्गत पीपीटी शो, व्याख्यान, कार्यशाळांद्वारे सूर्यग्रहण का? व कसे बघावे याबाबत मार्गदर्शन व जनजागृती केली जाणार आहे़ तर अनेक ठिकाणी फाउंडेशनच्यावतीने सामुहिक सूर्यग्रहण बघण्याचा कार्यक्रमही घेण्यात येणार आहे़नासा वापरत असलेल्या फिल्टरपासून बनविले गॉगल्ससूर्यग्रहण हे सुरक्षितरित्या विद्यार्थ्यांसह मोठ्यांना सुध्दा बघता यावे, म्हणून कुतूहलतर्फे सूर्यग्रहण ‘टेलिस्कोप’द्वारे पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे़ या टेलिस्कोपला फिल्टर लावण्यात येणार आहे़ ते फिल्टर अमेरिकेतील कंपनीचे असून अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ देखील आपल्या सर्व प्रकल्पांमध्ये या फिल्टरचा वापर करीत असते़ त्याच फिल्टरचा वापर करून सूर्यग्रहण पाहण्यासाठी गॉगल्स बनविण्यात आले असून कुतूहलतर्फे ते सुध्दा उपलब्ध असणार आहे़ अभियानात सहभागी होण्यासाठी कुतूहल फाउंडेशनची संपर्क साधण्याचे आवाहन महेश गोरडे यांनी केले आहे़

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव