शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेरची सहा जणांची टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2017 00:53 IST

कर्जबाजारी झाल्याने ते फेडण्यासाठी अमळनेर येथील सहा जणांनी डॉ.निखिल बहुगुणे यांच्या 12 वर्षाच्या मुलाचे अपहरण केले होते.

जळगाव : उद्योग व भिशीतून कर्जबाजारी झाल्याने ते फेडण्यासाठी अमळनेर येथील सहा जणांनी डॉ.निखिल बहुगुणे यांच्या 12 वर्षाच्या मुलाचे अपहरण केले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सात दिवसात या टोळीचा पर्दाफाश केला असून अमळनेर शहरात रात्रभर धाडसत्र राबवून सहा जणांना जेरबंद करण्यात आले आहे. त्यापैकी एकाला बडोदा (गुजरात) येथून ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, या टोळीने बनावट कागदपत्राच्या आधारावर मोबाइल सीम कार्ड मिळविल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी पत्रपरिषदेत दिली.गेल्या आठवडय़ात 3 जानेवारी रोजी संध्याकाळी साडेसात वाजता अमळनेर शहरातील ग्लोबल स्कूलजवळून डॉ.निखिल बहुगुणे यांच्या पार्थ या 12 वर्षाच्या मुलाचे अपहरण झाले होते. अपहरणकत्र्यानी पार्थला कारमध्ये कोंबून डॉ.बहुगुणे यांच्याकडे मुलाच्या सुटकेसाठी 50 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. महेश विनायक खांजोडकर (बारी) वय 33, त्याचा भाऊ सुनील विनायक बारी (वय 36 दोन्ही रा.बालाजीपुरा,अमळनेर), भरत दशरथ महाजन (वय 24 रा.शिवम नगर, अमळनेर), भटू हिरामण बारी (मूळ रा.अमळनेर ह.मु.बडोदा, गुजरात) व अनिल नाना भिल (वय 20, रा.बहादरपूर रोड, अमळनेर) या सहा जणांनी पार्थचे अपहरण केले होते.पोलीस ठार मारतील या चर्चेनेच सोडले पार्थलाघटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक सुपेकर यांनी तातडीने स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेशसिंह चंदेल, सहायक निरीक्षक आर.टी.धारबळे यांच्यासह पथकाला अमळनेरात रवाना केले होते. संपूर्ण शहरात नाकाबंदी करण्यात आली होती. अपहरणकर्ते सापडले तर सोडायचे नाही, थेट गोळ्याच झाडायच्या अशी चर्चा काही पोलिसांमध्ये सुरू असताना ते शब्द  शहरात पोलिसांच्या हालचालींवर लक्ष ठेवणा:या मुख्य सूत्रधार महेश याने ऐकले अन् त्याचा थरकाप उडाला. त्याने तातडीने सहका:यांशी संपर्क साधून पार्थला आहे त्या ठिकाणी सोडून देण्याचे सांगितले. त्यामुळे या पाच जणांनी अमळगाव येथे रात्री दीड वाजता सोडून पळ काढला होता.पथकाला दहा हजारांचे बक्षीसपार्थची सुखरूप सुटका व आरोपींच्या अटकेत यश आल्याने सुपेकर यांनी तपास पथकाला दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. त्यात पोलीस निरीक्षक राजेशसिंह चंदेल,सहायक निरीक्षक आर.टी.धारबळे, विजय पाटील, दिलीप येवले, चंद्रकांत पाटील, संजय पाटील, शशिकांत पाटील, अशोक चौधरी, रमेश चौधरी, नरेंद्र वारुळे, मिलिंद सोनवणे, रामकृष्ण पाटील, दिनेश बडगुजर, प्रकाश महाजन, जयंत चौधरी, विनोद पाटील, विलास पाटील, प्रदीप पाटील यांचा समावेश आहे.