शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेरच्या शेतक:याने केली वजा उत्पन्न दाखल्याची मागणी

By admin | Updated: June 14, 2017 12:53 IST

अन्यथा आत्महत्येस लेखी परवानगी द्यावी असेही त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे

ऑनलाईन लोकमतअमळनेर, जळगाव, दि. 14 - कृषी  मूल्य आयोगाचे नियम आणि आलेल्या उत्पनाच्या अनुषंगाने ऋण उत्पन्ननाचा दाखला द्यावा अशी मागणी तालुक्यातील मंगरूळ येथील हिरालाल केशव पाटील यांनी करून शासनाला कोंडीत पकडले आहे.  अन्यथा आत्महत्येस लेखी परवानगी द्यावी असेही त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे     हिरालाल पाटील यांच्याकडे मंगरूळ येथे सातबारा नोंदी प्रमाणे चार हेक्टर आणि 80 आर जमीन आहे. 2016-17 या आर्थिक वर्षात 60 आर ज्वारी,  30 आर बाजरी, 1 हेक्टर 30 आर कपाशी 2 हेक्टरी 20 आर कोबी अशी लागवड केली होती. त्याबाबतच्या नोंदी 7/12वर आहेत. महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाच्या निश्चित केलेल्या दरानुसार लावणी, पेरणी केलेल्या शेती पिकांच्या विक्री केलेल्या उत्पन्नाचे आणि आयोगाने दर्शविलेल्या प्रति क्विंटल खर्चास अनुसरून निश्चित केलेले दर तसेच प्रति हेक्टरी अपेक्षित उत्पन्न या अनुषंगाने केलेले मूल्यांकन पाहून 2016-17 या वर्षात हिरालाल पाटील यांना एक  लाख 96, 667 एवढे  वजा म्हणजे ऋण ( निगेटिव्ह) उत्पन्न आले आहे. याबाबत त्यांनी 29 पानांचा पुरावाही सादर केला आहे.  यापैकी कोणतीही माहिती खोटी निघाल्यास भांदवि प्रमाणे कायदेशीर कारवाईस पात्र राहील अशी हमी देऊन गावरान जागल्या सेनेचे संघटक हिरालाल पाटील यांनी कागदपत्रांच्या आधारे त्यांना वजा म्हणजे ऋण एक लाख 96 हजार 667 रुपयांच्या उत्पन्नाचा दाखला मिळावा अशी विनंती नुकतीच निवेदनाद्वारे केली.  जर तसा दाखला देय होत नसेल तर राब राब राबून शेतीत तोटा येत असेल तर आपल्या स्तरावरून आत्महत्या करण्याची लेखी परवानगी मिळावी अशी मागणी करून अधिकारी आणि शासनास चकित केले आहे. उपविभागीय अधिकारी संजय गायकवाड, तहसीलदार प्रदीप पाटील  आणि तलाठी याना निवेदन देण्यात आले आहे.  याबाबत उपविभागोय अधिका:यांनी उत्पनाचा दाखला देण्यासाठी सक्षम अधिकारी तहसीलदार असल्याने त्यांनी कागदपत्रे पाहून योग्य कार्यवाही करावी असे निर्देश दिले आहे.       तर तहसीलदार प्रदीप पाटील म्हणाले की वजा किंवा ऋण उत्पन्न दाखला देता येत नाही. मात्र दिलेल्या पुराव्यांची पडताळणी केली जाईल, असे सांगितले.