शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

By admin | Updated: December 5, 2014 15:08 IST

शहरातील वाढत्या अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येऊ पाहत आहे. पालिकेने त्याकडे पूर्णत: दुर्लक्षकेलेले आहे. सहा महिन्यांपूर्वी त्याबाबत सर्व्हेही करण्यात आला.

नंदुरबार :शहरातील वाढत्या अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येऊ पाहत आहे. पालिकेने त्याकडे पूर्णत: दुर्लक्षकेलेले आहे. सहा महिन्यांपूर्वी त्याबाबत सर्व्हेही करण्यात आला. दोन दिवस अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करण्यात आली, अपेक्षेप्रमाणे ती लागलीच बंददेखील झाली. त्यामुळे कच्च्या व पक्क्या अतिक्रमणांचा प्रश्न पुन्हा एकदा डोके वर काढू लागला आहे.

नंदुरबारात अतिक्रमणाच्या प्रश्नामुळे अनेक रस्ते अरुंद झाले आहेत. बाजारातील चौक आणि रस्त्यांवर तर दुचाकी चालविणेही मोठे जिकिरीचे ठरत आहे. पालिकेने या बाबीकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. गेल्या वर्षी जिल्हाधिकार्‍यांनी चारही पालिकांच्या कार्यक्षेत्रातील अतिक्रमण हटविण्याचे आदेश काढले होते. परंतु त्या आदेशाचे पालन झालेले नव्हते. काहींनी नावालाच अतिक्रमण काढले. नंदुरबारातदेखील कच्चे अतिक्रमण काढून वेळ निभावून नेण्यात आली. त्या ठिकाणी पुन्हा जैसे थे परिस्थिती झाली आहे.
केवळ इशारेच
पालिका वारंवार केवळ इशारे देऊन मोकळी होते. अतिक्रमणधारकांना स्वत:हून अतिक्रमण काढण्यासंदर्भात इशारा दिला जातो. वास्तविक स्वत:हून नागरिक कधीच अतिक्रमण काढत नाहीत. त्यामुळे पालिकेचा इशारा केवळ इशाराच राहणार आहे. त्यामुळे आधी अतिक्रमणधारकांना नोटिसा देणे, त्यानंतर आठ दिवसात काहीही कार्यवाही न झाल्यास पालिकेने स्वत:हून अतिक्रमण काढण्यास सुरुवात करावी लागते. नंदुरबारात गेल्या १0 ते १२ वर्षांत व्यापक स्वरूपात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आलेली नाही. पाच ते सहा वेळा राबविण्यात आलेली मोहीम केवळ दुकान, घरांच्या पायर्‍या, ओटे तोडणे, फेरीवाल्यांना हटविणे, दुकानदारांचे रस्त्यावरील सामान काढणे एवढय़ापुरतीच र्मयादित राहिली आहे. शिवाय तोडण्यात आलेल्या अतिक्रमणाच्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना न केल्याने पुन्हा संबंधितांनी त्या ठिकाणी पूर्वीचेच अतिक्रमण करण्याचे प्रकारदेखील वाढले आहेतच.
अनेक रस्ते डोकेदुखी
शहरातील पाच रस्त्यांवरील अतिक्रमम मोठी डोकेदुखी ठरली आहे. त्यात पालिका चौक ते नेहरू चौक, नेहरू चौक ते थेट बसस्थानक व रेल्वेस्थानक, हाटदरवाजा ते बसस्थानक, मंगळ बाजार व सुभाष चौक, धानोरा रोड व टिळक रोड यांचा समावेश आहे. या रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणावर कच्ची व पक्की अतिक्रमणे करण्यात आली आहेत. नेहरू चौक व स्टेशन रोडवरील व्यापार्‍यांचा मुद्दा उच्च न्यायालयात गेलेला आहे. या रस्त्यांवर राबविण्यात आलेली अतिक्रमण हटाव मोहीम र्मयादित स्वरूपाची राहिली आहे. त्यामुळे पुन्हा त्या ठिकाणी पूर्वीप्रमाणेच अतिक्रमणे झाली आहेत.
अवैध बांधकाम
पालिकेच्या हद्दीत जेवढेही बांधकाम करावयाचे असेल त्याची परवानगी पालिकेकडून घेणे आवश्यक असते. मात्र, बरेच नागरिक पालिकेने दिलेल्या परवानगीपेक्षा अधिकचे बांधकाम करून मोकळे होतात. त्याबाबतची माहिती किंवा परवानगी पालिकेकडून घेतली जात नाही. काही जण भोगवटा (कम्प्लिशन) प्रमाणपत्रासाठी आधी नियमानुसार बांधकाम दाखवतात. 
एकदाचे प्रमाणपत्र मिळाल्यावर पुन्हा आपल्या पद्धतीने व मनाप्रमाणे बांधकाम करून मोकळे होत असतात. अशा जादा बांधकाम करणार्‍यांचाही सर्व्हे पालिकेने करणे आवश्यक आहे. अशी बांधकामेदेखील पाडून त्यांच्याकडून जादाचा मालमत्ता कर वसूल केला पाहिजे. मात्र, पालिकेकडे तेवढी यंत्रणाच नाही.
 
■ शहरातील अनेक रस्त्यांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. मंगळ बाजार आणि सुभाष चौकात तर मोठी अडचण ठरते. रस्ता कुठे आणि चौक कुठे हेच समजत नाही. शिवाय ज्यांनी लाखो रुपये मोजून गाळे घेतले आहेत त्यांच्या दुकानांसमोरच फेरीवाले बसत असल्यामुळे अशा दुकानांमध्ये जाण्यासाठीदेखील जागा राहत नाही. हीच परिस्थिती स्टेशन रोडवरील आहे. पालिका चौकापासून ते थेट जुन्या जेपीएन रुग्णालयापर्यंत ही स्थिती आहे. माणिक चौकातदेखील यापेक्षा वेगळी स्थिती नाही. जळका बाजारात आधीच रस्ता अरुंद, त्यात भाजीपाला व फळे विक्री करणारे बसत असल्यामुळे चारचाकी वाहन जाणे जिकिरीचे ठरते. याशिवाय इतर परिसरातील रस्त्यांवरदेखील फेरीवाल्यांनी अतिक्रमण करून ठेवले आहे.