शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
3
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
4
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
5
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
6
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
7
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
8
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
9
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
10
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
11
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
12
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
13
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
14
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
15
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
16
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
17
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
18
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
19
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
20
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
Daily Top 2Weekly Top 5

युवारंगानंतर आता ‘उत्कर्ष’ स्पर्धेतून होणार लोककलांचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 16:38 IST

२८ ते ३१ राज्यस्तरीय ‘उत्कर्ष’ स्पर्धा : शोभायात्रेने होणार स्पर्धा प्रारंभ

जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि राष्ट्रीय सेवा योजना कक्ष उच्च व तंत्रशिक्षण विभाग मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने २८ ते ३१ जानेवारी या कालावधीत राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक स्पर्धा ‘उत्कर्ष’चे आयोजन करण्यात आले आहे. आता विद्यार्थ्यांना युवारंगानंतर पुन्हा ‘उत्कर्ष’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना लोककलेचे दर्शन घडणार आहे.३५० विद्यार्थ्यांना सहभागराज्यस्तरीय उत्कर्ष स्पर्धेत महाराष्ट्रातील कृषी व अकृषी विद्यापीठांमधील राष्ट्रीय सेवा योजनेचे ३५० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. विद्यापीठाच्या एका संघात रासेयोचे ९ विद्यार्थी व ९ विद्यार्थिनी आणि एक संघ व्यवस्थापक यांचा समावेश असले. या उत्कर्ष स्पर्धेत भारतीय लोककला, लोकवाद्य, संकल्पना नृत्य, काव्यवाचन, भित्तीचित्र, वक्तृत्व, निबंध, समुहगीत, छायाचित्रण या स्पर्धा होणार आहेत.पोवाडा, भारूड, भजनांनी येणार रंगतमंगळवार २८ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार ते प्रशासकीय इमारत अशी शोभायात्रा निघेल. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता स्पधेर्चे उद्घाटन होईल. बुधवार २९ रोजी सकाळी ९ वाजता पोवाडा, भारुड व भजन या भारतीय लोककलांची स्पर्धा होईल. त्यानंतर भित्तीपत्रक व कार्यप्रसिध्दी अहवाल प्रदर्शन होणार आहे. सकाळी ११ वाजता भारतीय लोकवाद्याची स्पर्धा होईल. त्यानंतर दुपारी २.३० वाजता संकल्पनानृत्य स्पर्धा होईल. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता काव्यवाचन स्पर्धा होईल. गुरुवार ३० जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता पथनाट्य स्पर्धा, सकाळी ११.३० वाजता निबंध स्पर्धा, दुपारी २.३० वाजता समुहगीत, सायंकाळी ५.३० वाजता घोषवाक्यासह भित्तीचित्र स्पर्धा आणि त्याच वेळी वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. शुक्रवार ३१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पारितोषिक वितरण होईल.दीक्षांत व अधिसभा सभागृहात होणार स्पर्धासर्व स्पर्धा विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात व अधिसभा सभागृहात होणार आहेत. कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असून या समित्यांच्या बैठका नुकत्याच झाल्या अशी माहिती विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक तथा उपक्रम सचिव डॉ. पंकजकुमार नन्नवरे यांनी दिली.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव