शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 13:42 IST

रेल्वेस्थानकावर खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.

भुसावळ :  कोरोना काळातही नियमांचे पालन न करणाऱ्या  खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर येथील रेल्वे स्थानकावर मंगळवारी कारवाई करण्यात आली. रेल्वेने अनधिकृत वेंडर्सवर कारवाई करीत तीन ते चार लाखांचे साहित्य जप्त केले आहे. या कारवाईमुळे अनधिकृत वेंडर्समध्ये खळबळ उडाली आहे.कोरोनाची दुसरी लाट  चक्रीवादळासारखी घोंगावत असल्यामुळे रुग्ण संख्येतदेखील मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. महाराष्ट्रातसुद्धा कोरोनाचा उद्रेक वाढल्याने लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई तसेच इतर प्रमुख शहरात कामाला असलेले परप्रांतीय मजूर मोठ्या संख्येने आपल्या गावाकडे रवाना होत आहे.  रेल्वेने जाणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनानेदेखील सतर्क होऊन उपाययोजना सुरू केल्या आहेत. देशात कोरोनाचा वाढता उद्रेक लक्षात घेता रेल्वे प्रशासनदेखील प्रवाशांच्या वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवून आहेत. रेल्वे स्थानकावर जाताना प्रवाशांच्या कोरोना रिपोर्टची पाहणी करूनच त्यांना आत सोडले जात आहे. तसेच शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करण्यासाठी पथक नियुक्त करण्यात आले आहे. सध्या परप्रांतीय मजूर रेल्वे मोठ्या संख्येने आपापल्या गावाकडे परत जात आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकावर गाडी आली असता खाद्यपदार्थ विक्री स्टॉलवर या प्रवाशांचे एकच झुंबड उडत असते. अशावेळी सोशल डिस्टंन्सिंग ठेवणे आवश्यक आहे. मात्र काही खाद्यपदार्थ विक्रेते अतिशय जवळ उभे राहून गर्दी करीत असतात. त्यामुळे एकाच ठिकाणी प्रवाशांची गर्दी होत असते. त्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने नियमावली जाहीर केली असून, त्याचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा दिला होता. त्यानुसार मंगळवारी  रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक एक ते आठवर दिवसभरात धडक कारवाई करण्यात आली आहे. यावेळी अनधिकृतपणे तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करीत त्यांच्याजवळील साहित्य जप्त करण्यात आले आहे. रेल्वे सूत्रांच्या माहितीनुसार जवळपास तीन ते चार लाखांचे साहित्य प्रशासनाने जप्त केले आहे. या कारवाईमुळे अनधिकृत वेंडर्समध्ये खळबळ उडाली आहे. रेल्वे स्थानकावर नियमांचे सक्तीने पालन केले जात आहे. यात कुचराई करणाऱ्यांवर प्रशासन कारवाई करीत असल्याचे यातून दिसून आले. रेल्वे वाणिज्य विभागाचे प्रबंधक युवराज पाटील व आरपीएफ आयुक्त क्षितिज गुरुव यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नियुक्त करण्यात आले आहे. या पथकात वाणिज्य निरीक्षक शकील शेख, किरण ठाकूर, आरपीएफ निरीक्षक यादव यासह तिकीट तपासणी कर्मचारी यांचा सहभाग करण्यात आला आहे. जप्त केलेले साहित्य पार्सल कार्यालयात ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ