शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रावेर हत्याकांडातील आरोपीस ९ दिवस पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 00:25 IST

चौघा भावंडांची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात गुरुवारी अटक केलेला आरोपी महेंद्र सीताराम बारेला यास पोलीस कोठडी सुनावली आहे.

रावेर : बोरखेडा रस्त्यालगतच्या एका १४ वर्षीय पीडितेवर अत्याचार करून तिच्यासह चौघा भावंडांची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात गुरुवारी अटक केलेला आरोपी महेंद्र सीताराम बारेला (१९) यास शुक्रवारी भुसावळ येथे अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर हजर केले असता, अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.पी.डोरले यांनी ३१ आॅक्टोबरपर्यंत ९ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.रावेर शिवारातील बोरखेडा रस्त्यालगतच्या शेख मुस्तफा शेख यासीन यांच्या केळीबागेतील रखवालदाराच्या घरात रात्री झोपलेल्या १४ वर्षीय मुलीवर आरोपी महेंद्र सीताराम बारेला याने अत्याचार केले. त्यासोबतच शहरातून दारू पिवून आलेल्या पीडितेच्या ११ वर्षीय भाऊ राहुल याने त्याच्या पाठोपाठ अनिल (वय ९) व चि. सुमन उर्फ नाणी (वय ५) यांनी प्रतिकार करून विरोध केला. याचा राग येवून आरोपी महेंद्र बारेला याने त्या तिघांसह १४ वर्षीय पीडितेचा खून करून अंगावर शहारे आणणारे बालहत्याकांड केल्याची घटना गत गुरुवारी रात्री घडली होती.दरम्यान, आरोपी महेंद्र बारेला यास विशेष पोलीस तपास पथकाचे प्रमुख तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंता, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी भुसावळ जिल्हा सत्र न्यायालयात आज हजर केले. जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.पी.डोरले यांनी ३१ आॅक्टोबरपर्यंत ९ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.दरम्यान, अ‍ॅड.सत्यनारायण पाल यांनी आरोपीचे वकीलपत्र सादर केले. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून जिल्हा अतिरिक्त न्यायाधिश डोरले यांनी आरोपीस नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी जिल्हा सत्र न्यायालयात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे हे हजर होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRaverरावेर