दारूचं व्यसन अन् घरही विकलं; जळगावात अखेर पत्नीचा संयम सुटला! मध्यरात्री संतापाच्या भरात पतीला संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 20:28 IST2026-05-07T20:28:07+5:302026-05-07T20:28:07+5:30

जळगावात जाचाला कंटाळून पत्नीने दारुड्या पतीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Accidental Death Turns Into Murder Probe Woman Arrested for Strangling Alcoholic Husband in Jalgaon | दारूचं व्यसन अन् घरही विकलं; जळगावात अखेर पत्नीचा संयम सुटला! मध्यरात्री संतापाच्या भरात पतीला संपवलं

दारूचं व्यसन अन् घरही विकलं; जळगावात अखेर पत्नीचा संयम सुटला! मध्यरात्री संतापाच्या भरात पतीला संपवलं

Jalgaon Crime : दारू पिऊन वारंवार त्रास देणाऱ्या भरत नामदेव पाटील याचा पत्नीने गळा आवळून खून केला. ही धक्कादायक घटना मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद असलेल्या या घटनेत मयताच्या गळ्यावरील व्रण व शवविच्छेदन अहवालानंतर शहर पोलिस ठाण्यात मयताची पत्नी मनीषा भरत पाटील (५०) हिच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कानळदा रस्त्यावरील केसी पार्क परिसरातील भरत पाटील हे पत्नी व दोन मुलांसह राहत होते. त्यांची पत्नी एका कापड दुकानात तर दोघं मुलं
एमआयडीसीत कंपनीत कामाला होते. भरत पाटील हे दररोज दारुच्या नशेत पत्नीसह मुलांना त्रास देत होते. मंगळवारी (५ मे) रात्री ९ वाजता मनिषा पाटील या कामावरुन घरी परतल्या त्यावेळी पती दारुच्या नशेत घराच्या ओट्यावर बसलेला होता. त्या वेळी त्याने पुन्हा दारुच्या नशेत पत्नीसोबत वाद घातला.

दोरीने आवळला गळा

पती व पत्नीत कडाक्याचे भांडण झाले. संतापाच्या भरात मनिषा पाटील यांनी पती भरत पाटील याचा दोरीच्या सहाय्याने गळा आवळला व पलंगावरून त्यास खाली ओढले. त्या वेळी जमीनीवर डोके आपटले गेले कानातून, नाकातून मोठा रक्तस्त्राव झाला. लगेचच परिसरातील एका तरुणाने भरत पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

व्यसनी पतीने घरही विकले

भरत पाटील यांना दारुचे व्यसन असल्यामुळे ते दिवसभर दारुच्या नशेत रहायचे. गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांनी राहते घरही विकले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात वाद देखील झाले होते. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळलेल्या पत्नीने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अन पोलिसांना आला घातपाताचा संशय

डॉक्टरांसह पोलिसांनी मयत भरत पाटील यांच्या शरिराची पाहणी केल्यानंतर त्यांच्या मानेवर गळा आवळल्याचे व्रण दिसले. त्यामुळे पोलिसांनी घातपाताचा संशय व्यक्त केला. त्यानंतर बुधवारी दुपारी सुमारास भरत पाटील यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक अहवालावरुन भरत पाटील यांचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाल्याचे निष्पन्न झाले.

मद्यपी पतीचा त्रास झाला असह्य

भरत पाटील यांचा पलंगावरुन पडून नव्हे तर गळा आवळून मृत्यू झाल्याचे निष्पन्न होताच, पोलिसांनी संशयित मनीषा पाटील यांची कसून चौकशी केली असता, दारुच्या आहारी गेलेल्या पतीकडून वारंवार त्रास दिला जात होता. त्याला कंटाळून संतापाच्या भरात गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. त्यामुळे अकस्मात मृत्यूची नोंद असलेल्या प्रकरणात नंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title : शराबी पति, घर बेचा: जलगाँव में पत्नी ने पति का गला घोंटा

Web Summary : जलगाँव में, एक पत्नी ने वर्षों के दुर्व्यवहार और आर्थिक तंगी से तंग आकर अपने शराबी पति का गला घोंट दिया। पति की शराब पीने की आदत और घर बेचने के कारण घातक टकराव हुआ, जिसके परिणामस्वरूप पत्नी को हत्या के आरोप में गिरफ्तार किया गया।

Web Title : Drunk Husband, Sold Home: Wife Strangles Husband in Jalgaon

Web Summary : In Jalgaon, a wife strangled her alcoholic husband after enduring years of abuse and financial ruin. The husband's drinking and selling of their home led to a fatal confrontation, resulting in the wife's arrest for murder.