कजगाव येथे अपघात, तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:12 IST2021-06-29T04:12:07+5:302021-06-29T04:12:07+5:30

कजगाव, ता. भडगाव : येथील फळ विक्रेता अनिस समद मण्यार यांच्या चारचाकी वाहनास अपघात होऊन यात गाडीमधील मण्यार यांची ...

Accident at Kajgaon, three injured | कजगाव येथे अपघात, तीन जखमी

कजगाव येथे अपघात, तीन जखमी

कजगाव, ता. भडगाव : येथील फळ विक्रेता अनिस समद मण्यार यांच्या चारचाकी वाहनास अपघात होऊन यात गाडीमधील मण्यार यांची पत्नी, मुलगा व ते स्वत: जखमी झाले. जखमींना पाचोरा येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

येथील फळ विक्रेते अनिस समद मण्यार (२९) हे जळगाव माहेरी गेलेल्या पत्नी व मुलांना घेण्यास आपले वाहन (एमएच १९ सीझेड ६५१९)ने गेले होते. जळगाव येथून परिवारासह कजगाव येथे येत असताना लासगावजवळ वळणावर रिमझिम पडत असलेल्या पावसामुळे व समोरून येणाऱ्या वाहनांच्या लख्ख प्रकाशामुळे वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन उलटले. यात अनिस, पत्नी शाकिरा अनिस मण्यार (२८, रोहन अनिस मण्यार (५) हे तिघे जण जखमी झाले. पाठीमागून आलेल्या वाहनातून जखमींना पाचोरा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

===Photopath===

280621\img-20210628-wa0050.jpg~280621\img-20210628-wa0036.jpg

===Caption===

मण्यार यांच अपघातग्रस्त वाहन~मण्यार यांचे अपघातग्रस्त वाहन

Web Title: Accident at Kajgaon, three injured