जळगावच्या भाविकांचा अपघात, २ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 05:19 PM2021-08-24T17:19:27+5:302021-08-24T17:19:55+5:30

९ जखमी : शिरवेलहून परतताना पाल जवळ काळाचा घाला

Accident of Jalgaon devotees, 2 killed | जळगावच्या भाविकांचा अपघात, २ ठार

जळगावच्या भाविकांचा अपघात, २ ठार

Next

रावेर/ पाल : श्रावण सोमवारनिमित्त मध्यप्रदेशातील शिरवेलच्या महादेवाचे दर्शन घेऊन येणाऱ्या जळगावातील भाविकांच्या मालवाहू वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने हे वाहन झाडावर आदळून २ युवक ठार झाले तर ९ जण जखमी झाले. पाल जवळ वनविभागाच्या तपासणी नाक्याच्या पुढे थोड्या अंतरावर हा भीषण अपघात २३ ऑगस्ट रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास झाला.

या दुर्घटनेबाबत रावेर पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव येथील कांचननगर भागातील दहा युवक श्रावण सोमवार निमित्ताने चालकासह मध्यप्रदेशातील शिरवेलच्या महादेवाच्या दर्शनासाठी छोट्या मालवाहू वाहनाने (एम.एच.- १९/सी.वाय- ५३१५) गेले होते. दरम्यान, तिकडून पालमार्गे परत येत असतांना चालक विक्की अरूण चौधरी (वय २५, रा कांचननगर, जळगाव ) हा बेदरकारपणे वाहन चालवत असताना त्याचा वाहनावरील ताबा सुटून सदरचे भरधाव वेगातील वाहन रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या निंबाच्या झाडावर र आदळून पलटी झाल्याने त्यात बसलेले गोलू बंडू परदेशी (वय २६) व प्रशांत साहेबराव तांदुळकर (वय ३६) दोन्ही रा कांचननगर जळगाव हे जागीच ठार झाले. तर सदर मालवाहू वाहनातील भूषण दिलीप सपकाळे (वय २६) ,अजय सुनील वाल्हे (वय २१) , गणेश रवींद्र सोनवणे (वय २३) , परेश निंबा सोनवणे (वय २६) , चेतन रवींद्र मोरे (वय २३) , पवन रवींद्र मोरे (वय २२) , महेश गोविंदा चौधरी (वय २१) , गजानन रमेश पाटील (वय २४) व चालक विक्की अरूण चौधरी (वय २५) (सर्व रा. कांचननगर, जळगाव ) असे ९ जण दुखापत होवून गंभीर जखमी झाले. हा भीषण अपघात पाल वनविभागाच्या तपासणी नाक्याच्या पुढे अर्धा कि. मी. अंतरावर झाला.

या अपघाताची खबर मिळताच पाल दूरक्षेत्राचे पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र राठोड, पोकॉ नरेंद्र बाविस्कर, पोकॉ. दीपक ठाकूर, रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, फौजदार अनिस शेख, फौजदार मनोज वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केले.

दरम्यान, मयत गोलू बंडू परदेशी (वय २६) व प्रशांत साहेबराव तांदुळकर (वय ३६) यांचे मृतदेहाचे रावेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक डॉ. एन. डी. महाजन यांनी शवविच्छेदन केले.

जखमी़पैकी भुषण दिलीप सपकाळे (वय २६) यांचे फिर्यादीवरून रावेर पोलीसात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ व मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये वाहनचालक विक्की अरूण चौधरी यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेरचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख हे तपास करीत आहेत.

Web Title: Accident of Jalgaon devotees, 2 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.