शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

पळवून नेलेली अल्पवयीन मुलगी नऊ आठवड्यांची गर्भवती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : घरफोडीचे तब्बल ११ गुन्हे असलेल्या गुन्हेगाराने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेले. ती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : घरफोडीचे तब्बल ११ गुन्हे असलेल्या गुन्हेगाराने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेले. ती मुलगी नऊ आठवड्यांची गर्भवती राहिली आहे. दरम्यान, संशयित मोहनसिंग जगदीशसिंग बावरी (वय १९,रा.तांबापुरा, जळगाव) याला एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. पीडितेला बाल निरीक्षणगृहात पाठविण्यात आलेले आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावातून १६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता अल्पवयीन मुलगी गायब झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर तिच्या पालकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार कल्‍पनाबाई सुधाकर गवारे (रा. आयोध्यानगर, जळगाव) या महिलेविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. देवदर्शनाला जातो असे सांगून कल्‍पनाबाई हिने पीडितेला पळवून नेले होते, असे तक्रारदारांचे म्हणणे होते. पोलिसांनी केलेल्या चौकशीत मोहनसिंग याने पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढत लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर तिला पळवून नेले. दोघांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता ती नऊ आठवड्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले, त्यानुसार मोहनसिंग याच्याविरुद्ध बलात्काराचे वाढीव कलम लावण्यात आले. दरम्यान, या प्रकरणात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, ॲट्रॉसिटीचे कलम लावण्यात आलेले आहे. सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा व पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे या गुन्ह्याचा तपास करीत आहे.

अटकेतील मोहनसिंग याला उपनिरीक्षक विशाल सोनवणे यांनी मंगळवारी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस.जी ठुबे यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे ॲड. पंढरीनाथ चौधरी यांनी बाजू मांडली. या गुन्ह्यातील अन्य आरोपी फरार असल्याने त्यांना अटक करण्याचे कारण सांगून पोलीस कोठडीची मागणी केली.

मोहनसिंग बावरी सराईत गुन्हेगार

मोहनसिंग बावरी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध घरफोडी, चोरी, मारामारी, प्राणघातक हल्ला व खुनाचा प्रयत्न आदी प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. जिल्हा पेठ व रामानंदनगर पोलीस ठाण्यात प्रत्येकी तीन, तर एमआयडीसी पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत. आता अपहरण व बलात्काराचा हा सहावा गुन्हा या पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. आतापर्यंत त्याच्याविरुद्ध १२ गुन्हे दाखल झालेले आहेत.