शिरसोलीच्या तरुणाला ७२ हजारांचा ऑनलाइन गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:56 IST2021-02-05T05:56:55+5:302021-02-05T05:56:55+5:30

जळगाव : फेसबुकवर कार विक्रीची जाहिरात पाहून ही कार खरेदीच्या नावाने शिवकुमार सुकलाल बारी (२७, रा.शिरसोली, प्र.न.) या तरुणाला ...

72 thousand online gangster to a young man from Shirsoli | शिरसोलीच्या तरुणाला ७२ हजारांचा ऑनलाइन गंडा

शिरसोलीच्या तरुणाला ७२ हजारांचा ऑनलाइन गंडा

जळगाव : फेसबुकवर कार विक्रीची जाहिरात पाहून ही कार खरेदीच्या नावाने शिवकुमार सुकलाल बारी (२७, रा.शिरसोली, प्र.न.) या तरुणाला ७२ हजार ५०० रुपयात ऑनलाइन गंडविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकवर एका व्यक्तीने कार विक्रीची जाहिरात देऊन त्याचा मोबाइल क्रमांक दिलेला होता. त्यावर शिवकुमार बारी याने संपर्क साधला असता पुणे विमानतळावर आर्मी कर्मचारी असल्याचे संबंधित व्यक्तीने सांगून ५ सप्टेबर २०२० रोजी बँक खात्यात ७२ हजार ५०० रुपये ऑनलाइन भरायला लावले. त्यानंतरही कार न आल्याने या तरुणाने पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यावरुन शनिवारी अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल केला. उपनिरीक्षक विशाल सोनवणे या गुन्ह्याचा तपास करीत आहे.

Web Title: 72 thousand online gangster to a young man from Shirsoli