शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

सुरत महामार्गावरील अपघातात 4 ठार, 10 जखमी

By admin | Updated: March 26, 2017 14:46 IST

ट्रक व सुमोची समोरा- समोर धडक होवून झालेल्या भीषण अपघातात सुमोमधील 3 जण जागीच ठार व एकीचा उपचादरम्यान मृत्यू झाल़ा तर 10 जण जखमी झाले आह़े

 मुकटी जवळ ट्रक- सुमोची धडक : रास्तारोकोमुळे वाहतुक ठप्प

 
धुळे, दि.26- नागपूर- सुरत महामार्गावरील मुकटी शिवारात ट्रक व सुमोची समोरा- समोर धडक होवून झालेल्या भीषण अपघातात सुमोमधील 3 जण जागीच ठार व एकीचा उपचादरम्यान मृत्यू झाल़ा तर 10 जण जखमी झाले आह़े तिघांमध्ये दोन बालकांचा समोवश आह़े ही घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली़ जखमींना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आह़े दरम्यान महामार्गावरील खड्डे बुजवावे, यासह अन्य मागण्यासाठी ग्रामस्थांनी दीड ते दोन तास रास्ता रोको आंदोलन केल़े त्यामुळे वाहतूक ठप्त झाली होती़ आश्वासनंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतल़े 
फरजाना ईसाक (30 रा़ ओसाडा आवाज, गणेपुर, सुरत, गुजरात), सुमय्या इब्राहीम मकवा (7), सिध्दी ईसाक मकवा (4) हे तिघे जागीच ठार झाले. तर  शहाजा सिध्दी मकवा (23) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ जखमींमध्ये फरीदाबी अली मोहंमद (वय 46), फरजना इब्राहीम मकवा (वय 30), ईसाद सालम मकवा (वय 55), सिध्दी अनस ईसाक मकवा (वय 2), सिध्दी ईसाक अत्तर हुसैन मकवा (वय 29), सिध्दी उजेस ईस्माईल मकवा (वय 17), सिध्दी फरसाना ईब्राहीम मकवा (वय 26), इब्राहीम युसुफ मकवा (वय 34) सिदीक चाँद (वय28), मोहंम्मद जसद सिदीक (वय 3) सर्व (रा़ वरी गल्ली बाजार, दास्तीपुर, खान साहेब बाढा, सुरत, गुजरात) यांचा समावेश आह़े त्यातही दोन जण गंभीर आहेत़ 
सर्व प्रवासी 26 मार्च रोजी पहाटे सुमो वाहनाने (जी़जे 7 आर 6980) सुरतहुन पारोळा येथे नातेवाईकांकडे साखरपुडय़ासाठी निघाले होत़े सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास मुकटी शिवारात सुमोची व समोरून येणा:या भरधाव ट्रकची (एमएच 4 एफ़पी 0556) जोददार धडक झाली़ त्यामुळे सुमोवाहनाचा वरील संपुर्ण भाग कापला गेला व वाहन रस्त्याच्या कडेला उतरल़े तसेच धडकेनंतर ट्रकही रस्त्याच्या कडेचे झाड तोडून खाली उतरले होत़े  जखमींना सकाळी नऊ वाजता आयशर वाहनाने (एमएच 18  एए 7653) हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केल़े
रास्ता रोको, दोन तास वाहतूक ठप्त
अपघातानंतर महामार्गावरील खड्डे बुजवावे यासह इतर मागण्यांसाठी काँग्रेसतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आल़े त्यामुळे वाहतूक ठप्त झाली होती़ वाहनांच्या रांगा लागल्या होता़ पोलिसांसह  राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिका:यांनी ग्रामस्थांची समजुत काढली़ तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली़ अखेर महामार्ग प्राधीकरणच्या अधिका:यांनी दोन तासात खड्डे बुजवविण्याचे आश्वासन दिल़े त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आल़े