शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

एनएमएमएस परीक्षेला ३१५ विद्यार्थ्यांची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:17 IST

जळगाव : केंद्र शासनाच्या वतीने आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी संधी मिळावी, या उद्देशाने ‘एनएमएमएस’ शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. ...

जळगाव : केंद्र शासनाच्या वतीने आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी संधी मिळावी, या उद्देशाने ‘एनएमएमएस’ शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. मंगळवारी जिल्ह्यातील ९ केंद्रांवर ही परीक्षा सुरळीत पार पडली. परीक्षेला १ हजार ७८२ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती, तर ३१५ विद्यार्थ्यांनी दांडी मारली होती.

इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘एनएमएमएस’ परीक्षा घेतली जाते. ज्या पालकांचे उत्पन्न दीड लाख रुपयांच्या आत आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते. भारतातून एक लाख विद्यार्थ्यांना ‘एनएमएमएस’ परीक्षा उत्तीर्ण केल्यास शिष्यवृत्ती दिली जाते. महाराष्ट्रातील १० टक्के विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. यापूर्वी एनएमएमएस परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जात होती; परंतु आता त्यात वाढ करण्यात आली असून, वर्षाला १२ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. जळगाव जिल्ह्यातून २०९७ विद्यार्थ्यांनी एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी केली होती. मंगळवारी ९ केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी संपूर्ण काळजी घेण्‍यात आली. २०९७ पैकी १७८२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली तर ३१५ विद्यार्थ्यांची परीक्षेला अनुपस्थिती होती.

अशी आहे केंद्रनिहाय उपस्थिती

जिल्ह्यातील केंद्र हजर संख्‍या

जी. एस. हायस्कूल (पाचोरा) १४४

ए. बी. गर्ल्स हायस्‍कूल (चाळीसगाव) २४८

श्री संत गाडगे महाराज स्कूल (भुसावळ) १३२

साने गुरुजी नूतन स्कूल (अमळनेर) १५०

ए. टी. झांबरे विद्यालय (जळगाव) २०४

न्यू इंग्लिश मीडियम स्कूल (जामनेर) ३०४

कुडे स्कूल (धरणगाव) १६०

के. नारखेडे (भुसावळ) १५९

प्रताप विद्यामंदिर (चोपडा) २८१

=========================================

गैरहजर संख्या

४२

२३

५१

१४

३६

२७

२५

३३

६४