शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

मुदत ठेवीच्या पावत्या बेकायदेशीर वर्ग करुन १६ कोटीचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:08 IST

जळगाव : बीएचआर प्रकरणात अटक केलेला सूरज झंवर याने पिता सुनील झंवर व इतरांनी संगनमताने साई मार्केटींग ॲण्ड ट्रेडींग ...

जळगाव : बीएचआर प्रकरणात अटक केलेला सूरज झंवर याने पिता सुनील झंवर व इतरांनी संगनमताने साई मार्केटींग ॲण्ड ट्रेडींग कंपनी या नावाने टेंडर भरल्याचे भासवून पुण्यातील निगडी, घोले रोड व नशिराबाद येथील मालमत्ता खरेदीत १६ कोटी रुपयांचा अपहार केला असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात मुदत ठेवीच्या पावत्या विकत घेऊन त्या बेकायदेशीर वर्ग करण्यात आल्या असल्याचे तपासात उघड झाले आहे. सूरज याला शनिवारी पुणे न्यायालयात हजर केले असता २ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

बीएचआरचे कोहीनूर आर्केड बल्क लॅन्ड क्र.२ निगडी, ता.हवेली येथील दुकान क्र,१६,१७,१८ व १८ ए या सात कोटी रुपयांच्या मालमत्तेचा अपहार करुन ही मालमत्ता २ कोटी ११ लाख ११ हजार १११ रुपयांचा खरेदी केल्याचे भासविले, याच प्रकारे बालगंधर्व चौक, घोले रोड पुणे येथील चार व्यापारी गाळे ८ कोटीपेक्षा जास्त किमतीची केवळ ३ कोटी ११ लाख ३३ हजार १११ रुपयांना खरेदी केल्याचे भासविले. यातही अशाच प्रकारे पावत्या वर्ग करण्यात आल्या. नशिराबाद येथील दुकान क्र.१,२ व ३ हे देखील १९ लाख ५१ हजार ५१५ रुपयांना खरेदी केल्याचे भासवून अपहार केल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.

दरम्यान, सूरज हा साई मार्केटींग ॲण्ड ट्रेडींग प्रा.लि.या कंपनीचा संचालक आहे. विविध प्रकारचे टेंडर स्वत:च्या लॅपटॉपवरुन भरायचा. श्री साई मार्केटींग ॲण्ड ट्रेडींग कंपनी व श्री साई मार्केटींग ॲण्ड ट्रेडींग प्रा.लि. या दोघांचा पत्ता ४२, खान्देश मील शॉपींग कॉम्लेक्स, जळगाव हा एकच असून सूरज हा एका कंपनीत भागीदार होता.

बँक अधिकाऱ्यांना दिल्या धमक्या

पुणे पोलिसांनी झंवर कुटुंबियांची बँकेची माहिती घेण्याकरीता व खाते गोठविण्याकरीता बँकाना पत्रे दिलेली आहेत. त्यामुळे सूरज झंवर याने जळगाव येथील एचडीएफसी बँकेचे मॅनेजर व युनियन बँक ऑफ इंडियाचे नाशिक येथील रिजनल मॅनेजर यांना फोनद्वारे धमकी देऊन खाती खुले करण्याचे सांगितल्याचेही पोलिसांनी न्यायालयात सांगितले.