शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
2
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
3
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
4
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
6
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
7
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
8
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
9
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
10
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
11
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
12
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
13
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
14
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
15
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
16
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
17
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
18
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
19
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
20
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज देण्याच्या आमिषाने १४ जणांची तीन लाखांत फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:26 IST

जळगाव : कर्ज देण्याच्या नावाखली जिल्ह्यातील १४ तरुणांची २ लाख ८१ हजार ४५८ रुपयात फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला ...

जळगाव : कर्ज देण्याच्या नावाखली जिल्ह्यातील १४ तरुणांची २ लाख ८१ हजार ४५८ रुपयात फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी उत्तरप्रदेशातील नोएडा येथील शुभजनलक्ष्मी या कंपनीचा व्यवस्थापक दीपक चव्हाण, मानसी शर्मा व अनिल या तिघांविरुध्द शुक्रवारी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

खंडेराव बापू महाले (वय २९ रा. हरिविठ्ठल नगर) या एजंटने फिर्याद दिली आहे.

खंडेराव महाले या तरुणाची मार्च महिन्यात शुभ जनलक्ष्मी नोएडा कंपनीत जिल्ह्याचे एजंट म्हणून नियुक्ती झाली. ग्राहक गोळा करुन लोन विषयी माहिती देवून जीएसटी व प्रोसेसिंग फी ऑनलाईन भरण्याची माहिती देवून महाले जिल्ह्यात विविध ठिकाणचे ग्राहक गोळा करत होता. अशाप्रकारे महाले यांनी कर्ज देण्याच्या नावाखाली ७ ते २१ एप्रिल रामेश्‍वर कॉलनी, असोदा रोड, सिंधी कॉलनी, समतानगर, रामनगर, ममुराबाद, धरणगाव तालुक्यातील पथराड याठिकाणचे १४ ग्राहक जमविले. त्यांनी शुभ जनलक्ष्मी कंपनीच्या बँक खात्यावर एकूण २ लाख ८१ हजार ४५८ रुपये जमा केले. ७ महिने उलटूनही कुठलाही प्रतिसाद तसेच भरलेली रक्कम परत मिळत नसल्याने महाले यांच्यासह ग्राहकांना आपली फसवणूक झाल्याची खात्री झाली. त्यानुसार याप्रकरणी शुक्रवारी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

यांची झाली फसवणूक

महारु रघुनाथ गावंडे (रा.रामनगर), मयुर श्रावण बारी (रा. रथचौक),ज्योती कुमोत भंगाळे (सिंधी कॉलनी),समशेद मोहम्मद शेख (समतानगर),गजानन लहू कोळी (रा.खेडी, जळगाव),कैलास त्र्यंबक पालवे, विनोद बळवंत रोकडे ( रा.चिंचोली ता.जळगाव), संजय गडबड जाधव (रा. पथराड ता.धरणगाव), रामकृष्ण बारकु लंके (रा. पथराड ता. धरणगाव),विशाल विनोद कोळी (रा.आसोदा रोड,जळगाव),अमर विलास पाटील (रा.ममुराबाद, जळगाव) व रंजना पंढरीनाथ बाविस्कर (आसोदा रोड, जळगाव),कल्पना मोरे (रा. रामेश्‍वर कॉलनी) व भूषण वाणी (रा. रामेश्‍वर कॉलनी )आदी.