शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यातील १३ शाळा अनधिकृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 12:50 IST

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २३ - प्राथमिक शिक्षण विभागाकडून शासनाची परवानगी न घेता सर्रास कारभार चालविणाऱ्या शाळांची तपासणी मोहिम राबविण्यात आली होती़ या तपासणीत जिल्ह्यातील १३ शाळा ह्या अनधिकृत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे़ पालकांनी विद्यार्थ्यांचा या शाळेत प्रवेश घेऊ नये असे फलक या शाळांबाहेर लावण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण ...

ठळक मुद्देनोटीस बजावल्याफलक लावणार

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २३ - प्राथमिक शिक्षण विभागाकडून शासनाची परवानगी न घेता सर्रास कारभार चालविणाऱ्या शाळांची तपासणी मोहिम राबविण्यात आली होती़ या तपासणीत जिल्ह्यातील १३ शाळा ह्या अनधिकृत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे़ पालकांनी विद्यार्थ्यांचा या शाळेत प्रवेश घेऊ नये असे फलक या शाळांबाहेर लावण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण सभापती पोपट तात्या भोळे यांनी दिली़ दरम्यान, सर्वाधिक अनधिकृत शाळा ह्या चोपड्या तालुक्यात आढळुन आल्या आहेत़दरवर्षी अनधिकृत शाळांची यादी जाहिर करण्यात येत असते़ त्याअनुषघाने यंदा सुध्दा स्वंय-अर्थ सहाय्यीत शाळांची तपासणी करण्याचे आदेश शासनातर्फे देण्यात आले होते़ त्यानुसार प्राथमिक शिक्षण विभागाकडून जिल्ह्यातील १ ली ते ८ वी पर्यंतच्या स्वय अर्थसहाय्यीत शाळांची तपासणी मोहिम काही दिवसांपासून राबविण्यात येत होती़ अखेर ही मोहिम पूर्ण झाली आहे़ या मोहिमे दरम्यान प्राथमिक शिक्षण विभागाला धक्कादायक बाब समोर आली असून जिल्ह्यातील १३ शाळा या शासनाची परवानगी न घेता सर्रास कारभार चालवित असल्याचे आढळुन आले आहे़अशा आहेत अनधिकृत शाळा चोपडा- अंबाडे खाज्यामुंडा निवासी आदिवसी आश्रमशाळा, मराठे खाज्या नाईक आश्रमशाळा, मराठे ओम गुरूदत्त उच्च प्राथमिक शाळा, मोहिदा गुरूकुल इंग्लिश मीडीयम स्कुल, चोपडा अलवीया इंग्लिश मीडीयम स्कूल,़ चाळीसगाव- मेहुणबारे सरस्वती इंग्लिश मीडीयम स्कूल,़ भडगाव- भडगाव स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल, भडगाव सरस्वती इंग्लिश स्कूल,़ एरंडोल- कासोदा आर्यन इंटरनॅशनल स्कूल, कासोदा होली इंग्लिश मीडीयम स्कूल,़ मुक्ताईनगर- मुक्ताईनगर डॉ़ एपीजे़ अब्दूल कलाम इंग्लिश स्कूल,़ पाचोरा- नगरदेवळा बालाजी इंग्लिश मीडीयम स्कूल,़ धरणगाव- पाळधी आर्यन इंटरनॅशनल स्कूल अशा या १३ शाळा अनधिगृत ठरविण्यात आल्या आहेत़नोटीस बजावल्याजिल्ह्यातील तेराही शाळांना प्राथमिक शिक्षण विभागातर्फे नोटीस बजावण्यात आल्या आहेत़ तसेच शाळांवर कारवाई करण्याबाबत प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची शिक्षण सभापती पोपटतात्या भोळे यांनी दिली़फलक लावणारअनधिकृत शाळांच्या बाहेर गटशिक्षणाधिकाºयांना सांगून पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश घेऊ नये असे आशयाचे फलक लावण्याबाबत सुचना करण्यात आल्या आहेत़ तर शाळांवर त्वरीत कारवाई करण्यात येणार आहे़

टॅग्स :educationशैक्षणिकJalgaonजळगाव