जळगावात भीमराज ग्रुप कापणार 126 किलोचा केक

By Admin | Updated: April 13, 2017 12:54 IST2017-04-13T12:54:35+5:302017-04-13T12:54:35+5:30

भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांची शुक्रवार, 14 रोजी 126 वी जयंती साजरी होत आह़े

126 kg cake for Bhimraj Group in Jalgaon | जळगावात भीमराज ग्रुप कापणार 126 किलोचा केक

जळगावात भीमराज ग्रुप कापणार 126 किलोचा केक

 डॉ़ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

जळगाव,दि.13- भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांची शुक्रवार, 14 रोजी 126 वी जयंती साजरी होत आह़े यानिमित्ताने शहरातील संघटना, स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम होत आह़े भीमगीते, व्याख्यान, वत्कृत्व स्पर्धा आदी कार्यक्रमांव्दारे डॉ़आंबेडकर यांच्या कार्याला, आठवणींना उजाळा देण्यात येणार आह़े भीमराज गृपतर्फे रेल्वेस्टेशन येथे 126 किलोचा केक चिमुकल्यांच्या हस्ते कापण्यात येणार आह़े
आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठानतर्फे डॉ़ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची स्थापना केली आह़े 14 रोजी सकाळी 8 वाजता शिवाजीनगर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरवात होईल़ यानंतर शरद भालेराव यांचा भिमगीतांचा कार्यक्रम होईल़ एल़सी़डी़प्रोजेक्टव्दारे डॉ़ आंबेडकरांच्या कार्यावर चित्रफित दाखविली जाणार आह़े यादरम्यान रेल्वेस्टेशन येथे आंबेडकर पुतळ्याजवळ प्रश्न मंजुषाचा कार्यक्रम होईल़ 

Web Title: 126 kg cake for Bhimraj Group in Jalgaon