दुर्लक्षित बारव टिकविण्यासाठी तरुणाची शोधमोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:58 IST2021-02-05T07:58:53+5:302021-02-05T07:58:53+5:30

पारडगाव : महाराष्ट्र बारव मोहीम अंतर्गत मुंबईचा रोहन काळे दुचाकीवरून जालना जिल्ह्यात रानोमाळ फिरत असून, आतापर्यंत दुर्लक्षित अशा ...

A youth expedition to sustain a neglected barracks | दुर्लक्षित बारव टिकविण्यासाठी तरुणाची शोधमोहीम

दुर्लक्षित बारव टिकविण्यासाठी तरुणाची शोधमोहीम

पारडगाव : महाराष्ट्र बारव मोहीम अंतर्गत मुंबईचा रोहन काळे दुचाकीवरून जालना जिल्ह्यात रानोमाळ फिरत असून, आतापर्यंत दुर्लक्षित अशा ४०० बारवा त्यांनी शोधल्या. त्यांनी जिल्ह्यात सहा दिवसांत ६० बारवांची पाहणी केली.

मराठवाड्यातील विविध बारव शोधण्यासाठी त्याने लोणगाव, वाघुरळ येथे भेटी दिल्या आहेत. खंडवा, मलकापूर, जालना, पंढरपूर हा जुना पालखी मार्ग असून, यावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अनेक बारव बांधलेल्या आहेत. यातील अनेक बारवांचा वापर वारकरी वारीदरम्यान करीत असतात. त्यापैकीच वाघु्रळ, इंदेवाडी, अंबड येथे बारव आहेत. जालना जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तूचा अभ्यास करणारे रामभाऊ लांडे आणि रोहन काळे यांनी अंबड व घनसावंगी तालुक्यांतील तब्बल ६० बारवांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्याच्या नोंदी केल्या आहेत. तीर्थपुरी येथील लक्ष्मीनारायण मंदिरातील बारव तीर्थपुरीकरांनी स्वच्छ ठेवल्याचे पाहून रोहन काळे यांनी आनंद व्यक्त केला.

रविवारी त्यांनी पारडगाव येथील भैरवनाथ मंदिराच्या परिसरातील हेमाडपंथी बारवला भेट देऊन समाधान व्यक्त केले. राज्यातील एक हजार बारवांना भेटी देत त्याचे डॉक्युमेंटेशन करण्यासाठी काळे यांनी कोकण, मुंबई, गोवा, पश्चिम महाराष्ट्र येथील बारवांना भेटी देऊन महाराष्ट्र बारव मोहीम अंतर्गत रजिस्टर केल्या आहेत. वारसा संवर्धनासाठी लोकांनी आपले जलस्रोताचे जतन करावे यासाठी ही मोहीम सुरू केल्याचे रोहन काळे यांनी सांगितले.

Web Title: A youth expedition to sustain a neglected barracks