शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

शेततळ्यात पडून तरुणीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:41 IST

इब्राईमपूर येथील घटना ; भोकरदन : शेततळ्याच्या भिंतीवरून चालत असताना पाय घसरून पडलेल्या २० वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची ...

इब्राईमपूर येथील घटना;

भोकरदन : शेततळ्याच्या भिंतीवरून चालत असताना पाय घसरून पडलेल्या २० वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना भोकरदन तालुक्यातील इब्राईमपूर येथे सोमवारी दुपारी घडली. पूजा सिधुसिंग डोभाळ (२०) असे मयत तरुणीचे नाव आहे.

भोकरदन शहरापासून चार किलोमीटर अंतर असलेल्या इब्राईमपूर येथील शेतात सिधुसिंग डोभाळ यांचे कुटुंब राहते. पूजा ही औरंगाबाद येथे बीडीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊनमुळे पूजा मागील दहा महिन्यांपासून घरीच होती. सोमवारी दुपारी ती, तिच्या वहिनीसोबत शेततळ्यावर गेली होती. शेततळ्याच्या भिंतीवर चालत असताना पाय घसरून ती शेततळ्यात पडली. सोबतच्या महिलेने आरडाओरड केली; परंतु तेथे कोणीही नव्हते. पोहणे येत नसल्याने तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन तिला पाण्यातून बाहेर काढले. घटनास्थळाचा पोलीस उपनिरीक्षक भागवत नागरगोजे यांनी पंचनामा केला. याप्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

डॉक्टर बनण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले

पूजाही औरंगाबाद येथे बीडीएसचे शिक्षण घेत होती. तिला डॉक्टर बनायचे होते. त्यामुळे ती सतत अभ्यास करत होती; परंतु सोमवारी दुर्दैवी मृत्यू झाल्याने तिचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. तिच्या पार्थिवावर इब्राईमपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.