शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

नियमबाह्य वाळू उत्खननाकडे महसूलची डोळेझाक का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:56 IST

तळणी : मंठा तालुक्यातील वझर सरकटे येथील पूर्णा नदीपात्रातील वाळूघाटातून नियमबाह्य वाळूचे उत्खनन सुरू आहे. विषेश म्हणजे, या ठिकाणाहून ...

तळणी : मंठा तालुक्यातील वझर सरकटे येथील पूर्णा नदीपात्रातील वाळूघाटातून नियमबाह्य वाळूचे उत्खनन सुरू आहे. विषेश म्हणजे, या ठिकाणाहून वाळू उत्खनन करताना संबंधित गुत्तेदार शासनाच्या नियमांची पायमल्ली करीत आहे. मात्र, महसूलचे अधिकारी व कर्मचारी याकडे डोळेझाक करीत आहे.

वझर सरकटे या वाळूघाटाच्या लिलावानंतर संबंधित गुत्तेदाराला वाळू उत्खननासाठी महसूलने १२ जानेवारी रोजी ताबा दिला. यात गट क्रं. २०७, २१० व २१४ मधून ४०० मीटर लांबी, २५ मीटर रुंदी व १ मीटर खोली इतक्या क्षेत्रातून ३ हजार ५३३ ब्रास वाळू उत्खननाची परवानगी दिलेली आहे. मात्र, सिंदखेडाराजा तालुक्यातील झोंटिगा येथील गुत्तेदार शासनाने ठरवून क्षेत्राबाहेरून व क्षमतेपेक्षा जास्त वाळू उत्खनन करीत आहे. वाळूघाटावर एक ब्रास राॅयल्टीवर दोन ब्रास, दोन ब्रास राॅयल्टीवर चार ब्रास, चार ब्रास राॅयल्टीवर सहा ब्रास वाळूची वाहतूक करीत आहे. विनातारीख राॅयल्टी पावत्या देऊन महिनाभर त्याच राॅयल्टीवर वाळू वाहतूक सुरू आहे. एका राॅयल्टीसाठी ४ हजार ५०० रुपये वाहनधारकांना मोजावे लागतात. त्यानंतर त्याच राॅयल्टीवर फक्त ३ हजार रुपये घेतले जातात. वाहनांची संख्या वाढल्यानंतर जेसीबी व पोकलॅडने वाळू उत्खनन करुन वाहने भरुन दिली जातात, असे वाळू भरणाऱ्या मजुरांनी सांगितले. या वाळूघाटावरील सीसीटीव्ही नावालाच आहे. यासंदर्भात परतूरचे उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव म्हणाले, मंठ्याच्या तहसीलदार सुमन मोरे यांना चौकशी करून कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत.

लिलाव न झालेल्या ठिकाणाहून उत्खनन सुरू

महसूल विभागाने देवठाणा- उस्वद, वझर सरकटे, उस्वद- कानडी, कानडी- लिंबखेडा या चार वाळूघाटांतून वाळू उत्खननाची परवानगी दिली आहे. मात्र, सासखेडा, दूधा, वाघाळा, किर्ला, पोखरी केंधळे व भूवन येथे वाळू उत्खननाची परवानगी दिली नसताही अवैध वाळू उपसा सुरू आहे.

===Photopath===

200221\20jan_22_20022021_15.jpg~200221\20jan_23_20022021_15.jpg

===Caption===

पुर्णा नदीतील वाळूघाटावर चक्क जेसीबीने वाळू उत्खनन करुन वाहने भरली जात आहे. ~वझर सरकटे येथील वाळूघाटावर राॅयल्टीवर तारीख न लिहिता एकाच राॅयल्टीवर महिनाभर वाळू वाहतुकीची मुभा देणात आली आहे.