केदारखेडा येथील पाणीपुरवठा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:06 IST2021-02-05T08:06:29+5:302021-02-05T08:06:29+5:30

केदारखेडा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पूर्णा नदीपात्रातील सार्वजनिक विहिरीचे पाणी संपुष्टात आल्याने नळांना येणारे पाणी बंद झाले होते. त्यातच गाव ...

Water supply at Kedarkheda resumed | केदारखेडा येथील पाणीपुरवठा सुरू

केदारखेडा येथील पाणीपुरवठा सुरू

केदारखेडा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पूर्णा नदीपात्रातील सार्वजनिक विहिरीचे पाणी संपुष्टात आल्याने नळांना येणारे पाणी बंद झाले होते. त्यातच गाव कारभारी नवनियुक्त असून, कारभार हाती घेतलेला नसल्याने कोणाकडे ग्राहणे माडांवे? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला होता. परंतु, नर्वाचित सदस्यांना पाणीपुरवठा बंद असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. यावर संदीप शेळके, नूतन सदस्यांनी पाणीपुरवठा कशामुळे बंद आहे? याची माहिती ग्रामसेविका के. एल. रोकडे व कर्मचाऱ्यांकडून जाणून घेतली. नदीपात्रातील विहिरीचे पाणी संपले असल्याचे समजल्यानंतर तत्काळ बानेगाव धरणातील जिल्हा परिषदेच्या निधीतून झालेल्या पाइपलाइनची पाहणी केली. या पाइपलाइनला असलेली अडचण तत्काळ निकाली काढण्यासाठी आवश्यक ते साहित्यही उपलब्ध करून देण्यात आले. त्यानंतर गत दोन दिवसांत पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे सोमवारी संदीप शेळके यांच्या हस्ते मुख्य व्हॉल्व्हमधून पाणी सोडून गावचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य पंडित जाधव, ज्ञानेश्वर जाधव, रतन जाधव, बालू जाधव, बालासाहेब करतारे, संजय मोरे, रावसाहेब जाधव आदींची उपस्थिती होती.

(फोटो)

Web Title: Water supply at Kedarkheda resumed