शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
3
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
4
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
5
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
6
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
7
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
8
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
9
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
10
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
11
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
12
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
14
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
15
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
16
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
17
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 15:47 IST

छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनच्या बोर्डाजवळ लघुशंका करत असतानाचा तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता

जालना: छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनजवळील एका क्षुल्लक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून काही विकृत तरुणांनी केलेल्या मानसिक छळाला कंटाळून जालना जिल्ह्यातील एका तरुणाने आपले जीवन संपवले आहे. महेश आडे असे मृताचे नाव आहे. महेशला काही दिवसांपासून धमक्या आणि त्रास दिला जात होता, या जाचाला कंटाळून अखेर त्याने आत्महत्या केली. या घटनेने सोशल मीडियावरील 'ट्रोल्स'च्या क्रूरतेचा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे.

काय आहे नेमकी घटना?जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील ढोकमाळ येथील रहिवासी असलेला महेश आडे आणि त्याचा एक मित्र काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनच्या बोर्डाजवळ लघुशंका करत असतानाचा व्हिडिओ काही तरुणांनी शूट केला. संबंधित तरुणांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. या घटनेनंतर महेश आणि त्याच्या मित्राने व्हिडिओद्वारे माफीही मागितली होती. मात्र, त्यानंतरही क्रूर आणि विकृत मानसिकतेच्या काही तरुणांनी महेशला सातत्याने त्रास देणे सुरूच ठेवले.

धमक्या आणि मानसिक छळवारंवार काही अज्ञात तरुण महेशला फोन करून आणि सोशल मीडियाद्वारे धमक्या देत होते. हा मानसिक छळ महेशसाठी असह्य झाला. समाजात बदनामी झाल्याच्या भीतीतून आणि या तरुणांच्या त्रासाला कंटाळून अखेर महेश आडे याने टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवले. या घटनेने महेशच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, तर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

आरोपींविरुद्ध गुन्हा दाखलमहेशच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे, महेशला मानसिक त्रास देणाऱ्या आणि धमक्या देणाऱ्या स्वप्नील देशमुख, श्रेयश जाधव, पवनराज जाधव, अजय प्रधान पाटील, राकेश पंडित. सुरज मताने आणि आणखी एकावर त्यांच्या इंस्टाग्राम आयडीवरून, आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या आरोपींचा आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या 'ट्रोल' टोळीचा कसून शोध घेत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Cyberbullying Victim Ends Life After Relentless Online Harassment

Web Summary : A young man from Jalna died by suicide after facing relentless cyberbullying. A video of him urinating near a railway station went viral, leading to constant threats and harassment despite his apology. Police have registered a case against several individuals involved.
टॅग्स :Jalanaजालनाcyber crimeसायबर क्राइमchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर