जामवाडीच्या सरपंचपदी सौमित्रा वाढेकर यांची बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:32 IST2021-02-11T04:32:44+5:302021-02-11T04:32:44+5:30

जालना : तालुक्यातील जामवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौमित्रा प्रताप वाढेकर तर उपसरपंचपदी सुधाकर विठ्ठल वाढेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...

Unopposed election of Soumitra Wadhekar as Sarpanch of Jamwadi | जामवाडीच्या सरपंचपदी सौमित्रा वाढेकर यांची बिनविरोध निवड

जामवाडीच्या सरपंचपदी सौमित्रा वाढेकर यांची बिनविरोध निवड

जालना : तालुक्यातील जामवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौमित्रा प्रताप वाढेकर तर उपसरपंचपदी सुधाकर विठ्ठल वाढेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित बैठकीत ही निवड करण्यात आली. पॅनल प्रमुख सुधाकर विठ्ठल वाढेकर यांनी सुरुवातीपासूनच विकासाच्या बाजूने नागरिक असल्याचे सांगितले. श्री संत भागीरथीमाई ग्रामविकास पॅनलला बहुमताने विजयी करून जामवाडी ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात दिली, असेही त्यांनी सांगितले. यावेळी नवनिर्वाचित ग्रा.पं. सदस्य रामभाऊ बडदे, शामराव लांडगे, शहाजी वाढेकर, ताराबाई काळे, गयाबाई डमरे, शारदा कोल्हे, पुष्पा लांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती तर पीठासीन अधिकारी म्हणून अंगद मोराळे, ग्रामसेवक पी.पी. खरात, तलाठी एस.ए. घुगे यांच्यासह पोलीस पाटील बद्रिनाथ वाढेकर, विजय वाढेकर, शिवाजी कोल्हे, दत्तात्रय वाढेकर, भानुदास खर्डेकर, बाबासाहेब वाढेकर, ज्ञानेश्वर वाढेकर, बालाजी कोल्हे, शिवाजी वाढेकर, प्रल्हाद बडदे, माजी सरपंच भास्कर वाढेकर, अंकुश वाढेकर, सुरेश वाढेकर, काकासाहेब वाढेकर, अशोक बडदे, रत्नाकर बडदे, परमेश्वर वाढेकर, मनोहर काळे, मंचीराम वाढेकर, बाबुराव वाढेकर, प्रकाश वाढेकर, देविदास वाहुळे, कैलास वाढेकर आदींची उपस्थिती होती.

Web Title: Unopposed election of Soumitra Wadhekar as Sarpanch of Jamwadi