भोकरदन (जि. जालना): मित्रासोबत फिरण्यासाठी आणि बुलेट गाडीचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तीन मित्रांच्या वाहनावरील ताबा सुटल्याने भीषण अपघात घडला. ६ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास बानेगाव पाटीजवळ ही घटना घडली. या अपघातात ऋषिकेश सर्जेराव लोखंडे याचा जागीच मृत्यू झाला आहे.
नेमकी घटना काय?
भोकरदन येथील यश मोहन हिवरकर (वय २०) आणि ऋषिकेश लोखंडे हे दोघे बुलेटवरून बामखेड येथील आपला मित्र विशाल बालाजी बकाल याच्या घरी गेले होते. तिथून विशालला सोबत घेऊन हे तिघेही केदारखेडा येथे आले. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरल्यानंतर ते राजूरच्या दिशेने निघाले होते. मात्र, चिंचोली पाटीजवळून पुन्हा भोकरदनकडे परतत असताना बानेगाव पाटीजवळ चालकाचा बुलेटवरील ताबा सुटला. वेगात असलेली गाडी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्ड्यात जाऊन कोसळली.
मदतीसाठी धावले हात
अपघात घडल्यानंतर जवळच असलेल्या पेट्रोल पंपावरील कर्मचारी आणि विलास काळे, योगेश काळे, बालाजी बकाल यांसह अनेक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. गंभीर जखमी यश हिवरकर आणि विशाल बकाल यांना तातडीने जालन्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लोखंडे कुटुंबाचा आधार हरपला
मयत ऋषिकेश लोखंडे हा सर्जेराव लोखंडे यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याला दोन बहिणी आहेत. घरातील तरुण आणि एकुलता एक मुलगा गेल्याने बरंजळा लोखंडे गावावर शोककळा पसरली आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास ऋषिकेशच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Web Summary : A horrific accident near Banegaon claimed the life of Rishikesh Lokhande and critically injured two others, Yash Hivarkar and Vishal Bakal. The three friends were riding a Bullet when the driver lost control, resulting in the fatal crash. Lokhande was the only son in his family.
Web Summary : बानेगांव के पास एक भयानक दुर्घटना में Rishikesh Lokhande की मौत हो गई और दो अन्य, Yash Hivarkar और Vishal Bakal गंभीर रूप से घायल हो गए। तीनों दोस्त बुलेट पर सवार थे तभी चालक ने नियंत्रण खो दिया, जिसके परिणामस्वरूप घातक दुर्घटना हुई। Lokhande अपने परिवार में इकलौता बेटा था।