वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:28 IST2021-01-21T04:28:58+5:302021-01-21T04:28:58+5:30

कारवाईची मागणी परतूर : शहरासह ग्रामीण भागात अवैधरित्या दारूविक्री जोमात सुरू आहे. तळीरामांमुळे कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. ...

Traffic jam | वाहतुकीची कोंडी

वाहतुकीची कोंडी

कारवाईची मागणी

परतूर : शहरासह ग्रामीण भागात अवैधरित्या दारूविक्री जोमात सुरू आहे. तळीरामांमुळे कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. तरी अवैधरित्या दारूविक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

अपघाताचा धोका

बदनापूर : शहरातील प्रमुख मार्गावर अनेक वाहन चालक वाहने उभी करीत आहेत. रस्त्यावरच वाहने उभी राहत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. रस्त्यावर वाहने लावणाऱ्या चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

मोबाईलधारक त्रस्त

जालना : शहरासह परिसरातील बीएसएनएलची सेवा पूर्णत: विस्कळीत झाली आहे. एकमेकांना संपर्क साधणेही मुश्किल होत असून, इंटरनेट सेवेचाही बोजवारा उडाला आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

रस्ता दुरुस्तीची मागणी

जालना : शहरातील लक्कडकोट भागातून जाणाऱ्या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला असून, रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे.

Web Title: Traffic jam