शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टर मशागत महागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:04 IST

जालना : डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरचालकांनी शेती मशागतीच्या दरातही मोठी वाढ केली आहे. त्याचा फटका अस्मानी- सुलतानी संकटांनी होरपळणाऱ्या ...

जालना : डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरचालकांनी शेती मशागतीच्या दरातही मोठी वाढ केली आहे. त्याचा फटका अस्मानी- सुलतानी संकटांनी होरपळणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसत आहे.

मागील काही वर्षांत पशुधनाची कमी झालेली संख्या आणि मजुरांचा उद‌्भवणारा प्रश्न यामुळे शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाचा वापर करून शेतीची मशागत सुरू केली आहे. ट्रॅक्टरद्वारे शेतातील बहुतांश कामे केली जातात. परंतु, डिझेलचे दर वाढले की शेतात ट्रॅक्टर घेऊन येणारेही शेती मशागतीचे दर वाढवून मागत आहेत. मागील वर्षी ट्रॅक्टरद्वारे नांगरणी करण्यासाठी सरासरी १२०० ते १५०० रुपये घेतले जात होते. परंतु, सध्या डिझेलचे दर वाढल्याने हा दर १८०० रुपयांवर गेला आहे. यापूर्वी मोगड्यासाठी जवळपास ६०० ते ६५० रुपये लागायचे आता हा खर्च ९०० रुपयांवर गेला आहे. पेरणीसाठी सरासरी १३०० ते १५०० रुपये घेतले जात होते. आता १५०० रुपये लागतात. एकूणच ट्रॅक्टरद्वारे केल्या जाणाऱ्या शेती मशागतीच्या कामांमध्ये एकरी ३०० ते ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. याचा सर्वाधिक फटका आर्थिक घडी विस्कटलेल्या शेतकरी वर्गाला बसत आहे.

एकरी १० हजारांचा खर्च

शेती मशागत ते पीक काढणीसाठी शेतकऱ्यांना एकरी जवळपास दहा हजारांचा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत आहे. नांगरणीसाठी १८०० रुपये, रोटा एक हजार रुपये, पेरणीसाठी एक ते दीड हजार रुपये, फवारणीसाठी जवळपास दीड हजार रुपये, काढणी, मळणी आणि वाहतूक खर्च वाढतो.

नांगरणी, पेरणी, मशागत आणि पीक काढणी ते वाहतूक हा खर्च पाहता शेतकऱ्यांना उत्पादन खर्च हाती पडणेही मुश्कील होऊन जात आहे. त्यात बाजारपेठेत मालाला दर कमी असला तर शेतकऱ्यांचे नुकसान होते.

गत काही महिन्यांपासू सतत डिझेलचे दर वाढत आहेत. शेतात ट्रॅक्टरद्वारे कामे करताना अधिकचे डिझेल लागते. शिवाय ट्रॅक्टरचेही नुकसान होण्याची भीती असते. शिवाय ट्रॅक्टरचा मेन्टेन्सही वाढत आहे. त्यामुळे ट्रॅक्टरधारकांचाही खर्च वाढला आहे. आर्थिक गणित जुळविण्यासाठी आम्हालाही नाइलाजास्तव मशागतीचे दर वाढवावे लागले.

- कृष्णा वाजे, तीर्थपुरी

शेतकरी अस्मानी- सुलतानी संकटांमुळे आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात मशागतीच्या कामासाठी ट्रॅक्टरचालक अधिकचे पैसे मागत आहेत. पैशांची बचत व्हावी म्हणून शेतकरी स्वत: व कुटुंबातील सदस्यांना सोबत घेऊन अनेक कामे करीत आहेत.

- गणेश बोबडे, शेतकरी

पशुधनाची संख्या कमी झाल्याने आता शेतीतील बहुतांश कामे ही ट्रॅक्टरद्वारे केली जात आहेत. परंतु, डिझेलचे दर वाढल्याचे कारण पुढे करीत ट्रॅक्टरचालकांनी शेतातील कामे करण्याचे दर वाढविले आहेत. त्यामुळे खर्च वाढला आहे.

- भीमराव खामकर, आनंदवाडी

नांगरणी १५००

१८००

मोगडा ६५०

९००

सरी ६५०

९००

पेरणी १०००

१५००

रोटा ७५०

१०००

पिरी ७५०

१०००