परतूर : तालुक्यातील सालगाव येथे पती-पत्नीचा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची मुलासह नातीनेच चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली. या प्रकरणी मृत महिलेचा मुलगा व नातीविरुद्ध परतूर ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसंताबाई मुंजा ठोके असे मृत महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी मुंजा तुळशीराम ठोके (वय ५९, रा. सालगाव, ता. परतूर) यांनी फिर्याद दिली आहे. मुंजा ठोके यांचा मधला मुलगा अंशीराम हा पत्नी कविता, दोन मुली व एका मुलासह वेगळा राहत होता. २५ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मुंजा ठोके हा मजुरी करून घरी परतला. अंशीरामच्या घरात पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता. मुंजा ठोके व त्यांची पत्नी वसंताबाई हे भांडण सोडविण्यासाठी तेथे गेले.
''आज म्हातारीचा विषयच संपवून टाका''त्यावेळी अंशीराम व त्याची मुलगी हे कविता हिला मारहाण करीत असल्याचे दिसले. अंशीरामच्या हातात चाकू होता. मुंजा ठोके व वसंताबाई यांनी वाद शांत करण्याचा प्रयत्न केला असता, मुलीने संतापाच्या भरात वडील अंशीराम यांना, ''आज म्हातारीचा विषयच संपवून टाका'', असे सांगितले. नंतर अंशीराम याने हातातील चाकूने वसंताबाई यांच्या डाव्या छातीवर वार केला. गंभीर जखमी झालेल्या वसंताबाई रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या.
बाप-लेकीवर गुन्हा दाखलघटनेनंतर आरोपी अंशीराम व त्याची मुलगी हे घटनास्थळावरून पसार झाले. जखमी वसंताबाई यांना नातेवाइकांच्या मदतीने तातडीने सेलू येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी परतूर पोलिस ठाण्यात अंशीराम मुंजा ठोके व मुलगी यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.
Web Summary : In Partur, a man and his daughter murdered his mother after a family dispute. The daughter egged him on to kill her. Police have registered a murder case and are investigating.
Web Summary : परतूर में, एक आदमी और उसकी बेटी ने पारिवारिक विवाद के बाद अपनी माँ की हत्या कर दी। बेटी ने उसे मारने के लिए उकसाया। पुलिस ने हत्या का मामला दर्ज कर लिया है और जांच कर रही है।